भांडण सोडविण्यास गेलेल्या माजी सरपंचाना टारगटाकडुन अरेरावीची भाषा, करजगावात तणावाचे वातावरण

पानेगावच्या सात-आठ टारगटांचा धुडगुस
भांडण सोडविण्यास गेलेल्या माजी सरपंचाना टारगटाकडुन अरेरावीची भाषा, करजगावात तणावाचे वातावरण

करजगाव | वार्ताहर

करजगावमध्ये मुलांचे भांडण सोडविण्यास गेलेल्या करजगावचे माजी सरपंच अशोकराव टेमक यांना 7 ते 8 टारगटांनी अरेरावीची भाषा करत दमबाजी केली. यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी सोनई पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांनी ग्रामस्थांशी चर्चा करत शांतता राखण्याचे आवाहन केले.

या टारगटांमध्ये काही अल्पवयीन असुन नावे समजली नसुन त्यातील काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. करजगावसह अंमळनेर, पानेगावात गावातील तसेच बाहेरगावच्या अनेक टारगटांचा वावर वाढत चालला असुन दमबाजी करणे, मुलींची छेड काढणे असे प्रकार सातत्याने होत आहे. यापुर्वीही अनेक टारगटांना ग्रामस्थांनी समज दिली होती. तसेच याविषयी टारगटावर कारवाई करण्याची मागणी सोनई पोलिसांना केली होती. तसेच करजगाव व परिसरात कायम स्वरूपी पोलिस बंदोबंद ठेवण्याची लेखी मागणी केली होती. मात्र पोलिसांनी याकडे गांभिर्याने न पाहिल्यामुळे या टारगटांचा त्रास वाढल्याने हा प्रकार झाल्याचे यावेळी ग्रामस्थांनी सांगीतले. या टारगटांचा पोलिसांनी त्वरीत बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.

टारगटांकडून एकास बेल्टने मारहाण

हा प्रकार होण्या अगोदर या टारगटांनी एका मुलास करजगाव विद्यालयापासुन लांडेवाडी रोडकडे बेल्ट व चापडीने जबर मारहाण केली. हा प्रकाराची माहिती माजी सरपंच अशोकराव टेमक यांना होताच ते भांडण सोठविण्याचा गेले असता टारगटांनी त्यांच्यावर अरेरावी करण्याचा प्रयत्न केला. याची माहिती ग्रामस्थांना होताच घटनास्थळी हजर झाले.यावेळी जागेवरच दोन टारगटांना पकडले तर चौघे पळुन गेले. गावातील तरूणांनी या टारगटांचा शोध घेत एकास ऊसाच्या शेतातुन पकडुन आणुन मारूती मंदिरात कोंडले.मात्र तीन जण फरार झाले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com