नेवाशातील 27 गावांत 58 संक्रमित

नेवाशातील 27 गावांत 58 संक्रमित

सोनईत 9, चांद्यात 7 तर म्हसले व देडगावात प्रत्येकी 5 बाधित

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यात (Newasa Taluka) काल 27 गावांतून 58 करोना संक्रमित आढळून आले. सर्वाधिक 9 बाधित सोनई (Sonai) येथे आढळून आले.

चांदा प्राथमिक केंद्राअंतर्गत (Chanda Primary Center) सर्वाधिक 13 संक्रमित आढळून आले असून त्यात एकट्या चांद्यातील (Chanda) 7 बाधितांचा समावेश आहे. दोन दिवसांपूर्वी चांद्यात (Chanda) 12 संक्रमित आढळले होते. मोरगव्हाण (Moregavhan) येथे दोघे तर बर्‍हाणपूर, लोहारवाडी, महालक्ष्मी हिवरे व घोडेगाव येथे प्रत्येकी एकजण बाधित आढळून आला.

सोनई केंद्राअंतर्ग़त (Sonai Center) काल 12 बाधित आढळले. यात सोनईत (Sonai) 9 तर लोहगाव, मोरेचिंचोरे व पानेगाव येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

कुकाणा केंद्राअंतर्गत 8 बाधित आढळले. देडगाव येथे 5 तर भेंडा खुर्द, तरवडी व तेलकुडगाव येथे प्रत्येकी एकजण बाधित आढळून आला.

सलाबतपूर केंद्राअंतर्गत म्हसले येथे 5 तर गोंडेगाव येथे दोघे बाधित आढळले. उस्थळदुमाला केंद्राअंतर्ग़ खरवंडी येथील तिघे तर उस्थळदुमाला येथे दोघे तर माळीचिंचोरा येथील एकजण बाधित आढळून आला.

शिरसगाव केंद्राअंतर्गत (Shirasgaon Center) शिरसगाव व माळेवाडी येथे प्रत्येकी दोघे बाधित आढळून आले. नेवासा बुद्रुक केंद्राअंतर्ग़त पाचेगाव येथे दोघे तर नेवासा बुद्रुक व उस्थळखालसा येथे प्रत्येकी एकजण बाधित आढळून आला.

टोका प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत (Toka Primary Health Center) मुरमे येथे दोघे बाधित आढळून आले. नेवासा खुर्द प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत नेवासा शहरात (Newasa City) व तामसवाडी येथे प्रत्येकी एकजण संक्रमित आढळून आला. अशाप्रकारे काल 27 गावांतून 58 संक्रमित आढळून आले असून तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या15 हजार 595 इतकी झाली आहे.

तालुक्यात मागील काही दिवसांपासून संक्रमितांची संख्या वाढत असून दररोज सरासरी जवळपास 45 बाधित आढळून येत आहेत. बरे होऊन परतणार्‍यांची संख्याही मोठी आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com