नेवाशात 30 गावांतून 45 बाधित

नेवाशात 30 गावांतून 45 बाधित

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यात (Newasa Taluka) काल 30 गावांमधून 45 करोनाबाधित (Covid 19 Positive Patient) आढळून आले. सर्वाधिक 13 बाधित कुकाणा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या (Kukana Primary Health Center) कक्षेतील 10 गावांमध्ये आढळले. तर नेवासा बुद्रुक (Newasa Budruk) प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत (Primary Health Center) एकही बाधित आढळून आला नाही.

कुकाणा केंद्राअंतर्गत देडगाव येथे तिघे तर सुकळी येथे दोघे बाधित आढळले. भेंडा खुर्द (Bhenda), भेंडा बुद्रुक, अंतरवाली, जेऊरहैबती, वडुले, तरवडी, कुकाणा व तेलकुडगाव या 8 गावांतून प्रत्येकी एक बाधित आढळला.

शिरसगाव केंद्राअंतर्गत (Under Shirasgaon Center) 5 गावांतून 8 बाधित आढळले. वाकडी येथे तिघे, पिंपरीशहाली येथे दोघे तर गेवराई, सुलतानपूर व गोयगव्हाण या तीन गावांतून प्रत्येकी एकजण बाधित आढळला.

चांदा केंद्रांतर्गत चार गावांतून 9 बाधित आढळले. पाचुंदा येथे चौघे, चांदा व घोडेगाव येथे प्रत्येकी दोघे तर कौठा येथे एकजण संक्रमित आढळला.

उस्थळदुमाला केंद्रांतर्गत खरवंडी, म्हाळसपिंपळगाव व उस्थळदुमाला येथे प्रत्येकी एकजण बाधित आढळून आला.

सोनई केंद्राअंतर्गत चार गावातून 6 जण बाधित आढळले. वंजारवाडी येथे तिघे तर शिरेगाव, लांडेवाडी व लोहगाव येथे प्रत्येकी एकजण संक्रमित आढळला.

नेवासा खुर्द केंद्रांतर्गत नेवासा शहरात तिघे तर गोमळवाडी येथे दोघे असे पाचजण बाधित आढळून आले. सलाबतपूर केंद्रांतर्गत सलाबतपूर येथे एकजण बाधित आढळला. अशाप्रकारे 30 गावांतून 45 जण बाधित आढळून आले असून नेवासा तालुक्यातील आतापर्यंत करोना संक्रमितांची संख्या 13 हजार 474 इतकी झाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com