नेवासा तालुक्यात 16 गावांतून आढळले 24 करोना बाधित

नेवासा तालुक्यात 16 गावांतून आढळले 24 करोना बाधित

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील (Newasa Taluka) 16 गावांतून काल 24 करोना संक्रमित (Covid 19 Positive) आढळून आले असून तालुक्यात आतापर्यंतची करोना बाधितांची संख्या 13 हजार 93 इतकी झाली आहे.

नेवासा बुद्रुक प्राथमिक केंद्राअंतर्गत (Newasa Budruk Primary Center) 7 जण बाधित आढळले. त्यात बेलपिंपळगाव येथील तिघे, नेवासा बुद्रुक व बेलपांढरी येथील प्रत्येकी दोघांचा समावेश आहे.

सलाबतपूर केंद्रांतर्गत (Salabatpur Centers) गोगलगाव येथे तिघे तर मुकिंदपूर येथे एकजण बाधित आढळला. शिरसगाव केंद्रांतर्गत (Shirasgav Centers) नजिकचिंचोली व वाकडी येथील प्रत्येकी एकजण बाधित आढळला.

कुकाणा केंद्रांतर्गत वडुले येथे तिघे बाधित आढळले तर भेंडा बुद्रुक व देडगाव येथील प्रत्येकी एकजण बाधित आढळला.

चांदा केंद्रांतर्गत महालक्ष्मीहिवरे, पाचुंदा, रस्तापूर व झापवाडी या चार गावांत प्रत्येकी एकजण संक्रमित आढळला. नेवासा खुर्द केंद्रांतर्गत नेवासा खुर्द व निंभारी येथील प्रत्येकी एकजण बाधित आढळून आला.

टोका, सोनई व उस्थळदुमाला या तीन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेत एकही संक्रमित आढळून आला नाही.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com