नेवासा : 58 गावांतून आढळले 144 संक्रमित

सोनईत 13, माळीचिंचोरे 12, मुकिंदपूर 9 तर भानसहिवरेत 7 संक्रमित
नेवासा : 58 गावांतून आढळले 144 संक्रमित

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील 58 गावांतून काल 144 करोनाबाधित आढळून आले. सोनई येथे 13 माळीचिंचोरे येथे 12, मुकिंदपूर येथे 9 तर भानसहिवरे येथे 7 संक्रमित आढळून आले.

नेवासा शहरात 6, भानसहिवरा व भेंडा बुद्रुक येथे प्रत्येकी 5 संक्रमित आढळले. निंभारी, हंडीनिमगाव, व गोंडेगाव या तीन गवात प्रत्येकी चौघे बाधित आढळले. तरवडी, नारायणवाडी, करजगाव, गोगलगाव, देवगाव, बर्‍हाणपूर, बकुपिंपळगाव व बहिरवाडी या 8 गावांतून प्रत्येकी तिघे संक्रमित आढळले.

अंतरवाली, भेंडा खुर्द, चिलेखनवाडी, धामोरी, गळनिंब, घोडेगाव, लांडेवाडी, पाचेगाव, पिचडगाव, सुरेशनगर व वांजोळी या 11 गावांतून प्रत्येकी दोघे बाधित आढळले.

वरखेड, वंजारवाडी, वडाळा बहिरोबा, उस्थळदुमाला, तामसवाडी, सुकळी, शिरसगाव, शिंगवेतुकाई, सलाबतपूर, रस्तापूर, पानेगाव, पाचुंदा, नेवासा बुद्रुक, माळेवाडी, कुकाणा, कांगोणी, जेऊरहैबती, जळके खुर्द, जळके बुद्रुक, गोणेगाव, गोधेगाव, गेवराई, गणेशवाडी, दिघी, चांदगाव, चांदा, भालगाव, बाभुळखेडा, बाभुळवेढा या 29 गावांतून प्रत्येकी एकजण संक्रमित आढळला. अशाप्रकारे 58 गावांतून 144 संक्रमित आढळले असून तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या 10 हजार 481 झाली आहे.

4 गावांतून 41 संक्रमित

सोनई, माळीचिंचोरे, मुकिंदपूर व भानसहिवरे या चार गावांतून 41 संक्रमित आढळले. त्याशिवाय एका गावातून 6, दोन गावांतून प्रत्येकी पाच, 3 गावांतून प्रत्येकी चार, 8 गावांतून प्रत्येकी तिघे, 11 गावांतून प्रत्येकी दोघे तर 29 गावांतून प्रत्येकी एकजण बाधित आढळला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com