नेवासा तालुक्यात 20 गावांतून 47 बाधित

वडुले येथे 8, कुकाण्यात 6 तर तेलकुडगावात 5 बाधित
नेवासा तालुक्यात 20 गावांतून 47 बाधित

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा (Newasa) तालुक्यात करोना बाधितांच्या (Covid 19 Patient) संख्येने पुन्हा उसळी घेतली असून काल रविवारी एकाच दिवसात 47 संक्रमित आढळून आले. सर्वाधिक बाधितांच्या संख्येत कुकाणा प्राथमिक आरोग्य केंद्र (Kukana Primary Health Center) पुढे असून या केंद्रांतर्गत गावांतून एकूण 28 बाधित आढळून आले.

काल सर्वाधिक 8 बाधित वडुले येथे तर 6 बाधित कुकाण्यात (Kukana) आढळले. या केंद्रांतर्गत तेलकुडगाव येथील 5 जण, सुकळी येथे तिघे, देडगाव येथे दोघे तर तरवडी, भेंडा खुर्द व भेंडा बुद्रुक येथील प्रत्येकी एकजण बाधित आढळून आला.

उस्थळदुमाला केंद्रांतर्गत खरवडी येथे तिघे बाधित आढळले. शिरसगाव केंद्रांतर्गत पिंपरीशहाली येथे दोघे तर पाथरवाला, वाकडी व सुलतानपूर येथील प्रत्येकी एकजण बाधित आढळला.

सोनई केंद्रा (Sonai Center) अंतर्गत झापवाडी व पानसवाडी येथे तिघे तर सोनईत एकजण बाधित आढळला. नेवासा खुर्द केंद्रांतर्गत नेवासा खुर्द येथील एकजण बाधित आढळून आला. तालुक्यातील टोका, सलाबतपूर व चांदा या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत एकही बाधित आढळून आला नाही. नेवासा तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 13 हजार 201 इतकी झाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com