नेवासा : 54 गावांतून आढळले 228 संक्रमित

नेवासा : 54 गावांतून आढळले 228 संक्रमित

नेवाशात 36, घोडेगावात 28, सोनईत 18, भेंडा बुद्रुक 15 तर वडाळ्यात 11 बाधित

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील 54 गावांमधून काल 228 करोना संक्रमित आढळून आले. नेवासा शहरात सर्वाधिक 36, घोडेगावात 28, सोनईत 18, भेंडा बुद्रुक येथे 15, तर वडाळा बहिरोबा येथे 11 संक्रमित आढळले.

कुकाणा, नेवासा बुद्रुक व भानसहिवरा येथे प्रत्येकी 6 संक्रमित आढळले. जेऊरहैबती, गोगलगाव, गेवराई, देडगाव, लांडेवाडी या 5 गावांतून प्रत्येकी पाचजण संक्रमित आढळले.

खरवंडी, माळीचिंचोरा व बेलपांढरी येथे प्रत्येकी चौघे बाधीत आढळले. पाचेगाव, रांजणगाव, शिरसगाव, वांजोळी, वाटापूर व तामसवाडी या 6 गावांतून प्रत्येकी तिघे बाधित आढळले.

राजेगाव, पिंप्रीशहाली, पाथरवाला, मुकिंदपूर, माका, महालक्ष्मीहिवरे, खलालपिंप्री, करजगाव, गोधेगाव, गिडेगाव,चिलेखनवाडी, चांदा व बहिरवाडी या 13 गावांतून प्रत्येकी दोघे संक्रमित आढळले.

अमळनेर, बाभुळखेडा, बेलपिंपळगाव, गणेशवाडी, गोंडेगाव, जळके बुद्रुक, खेडलेकाजळी, खुपटी, लोहगाव, मक्तापूर, म्हाळसपिंपळगाव, मोरेचिंचोरे, नजिकचिंचोली, प्रवरासंगम, रस्तापूर, सलाबतपूर, सौंदाळा, शिंगणापूर, टोका, वंजारवाडी व वरखेड या 21 गावांतून प्रत्येकी एकजण संक्रमित आढळून आला.

अशाप्रकारे 56 गावांतून 228 संक्रमित आढळून आल्याने तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या 8076 झाली आहे.

5 गावांतून 108 संक्रमित

नेवासा शहर, घोडेगाव, सोनई, भेंडा बुद्रुक व वडाळा बहिरोबा या पाच गावांतून एकूण 108 संक्रमित आढळले. तीन गावांतून प्रत्येकी सहा, पाच गावांतून प्रत्येकी 5, तीन गावांतून प्रत्येकी चार, 6 गावांतून प्रत्येकी तीन, 13 गावांतून प्रत्येकी दोघे तर 21 गावांतून प्रत्येकी एकजण संक्रमित आढळला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com