करोना
करोना

नेवासात एका नगरसेविकेला व सरकारी डॉक्टरला करोनाची बाधा

तालुक्याची एकूण रुग्ण संख्या 125 वर

नेवासा।शहर प्रतिनिधी।Newasa

नेवासा नगरपंचायतीच्या एक नगरसेविका व एक सरकारी डॉक्टर यांना करोनाची बाधा झाली आहे.

नेवासा नगरपंचायतीच्या एका नगरसेविकेला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांची करोना चाचणी खाजगी प्रयोगशाळेत केली असता त्या नगरसेविका करोना बाधित असल्याचा अहवाल आज मंगळवारी दि.28 जुलै रोजी दुपारी खाजगी प्रयोगशाळेतून तालुका प्रशासनास मिळाला आहे. तसेच या नगरसेविकेच्या घरातीलच काही व्यक्तींची रॅपीड अँन्टीजन टेस्टद्वारे तपासणी करण्यात आली त्यामध्ये 3 व्यक्ती करोना बाधित आढळून आले आहेत.

तसेच तालुक्यातील एक शासकीय वैद्यकीय अधिकारी देखील करोना बाधित आढळून आले असल्याची माहिती तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांनी दिली. नेवासा तालुक्यात दिवसेंदिवस करोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे तालुका प्रशानाच्या वतीने काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या आता 125 वर गेली आहे.

Last updated

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com