नेवाशातील 47 गावांतून 117 संक्रमित

सर्व गावांत बाधितांची संख्या एक अंकी
नेवाशातील 47 गावांतून 117 संक्रमित

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यात काल 47 गावांतून 117 करोना संक्रमित आढळून आले. काल सलग दुसर्‍या दिवशी तालुक्यातील कोणत्याही गावात दोनअंकी संख्येने बाधित आढळले नाहीत. सोनईत सर्वाधिक 8 संक्रमित आढळून आले.

भेंडा बुद्रुक येथे 7, भेंडा खुर्द व शिंगणापूर येथे प्रत्येकी 6 बाधित आढळले. नेवासा शहर व लोहगावात प्रत्येकी पाच संक्रमित आढळले.

तरवडी, पानसवाडी, माळीचिंचोरा, महालक्ष्मी हिवरे, गिडेगाव या पाच गावात प्रत्येकी चौघे बाधित आढळले.

सुरेगाव, गेवराई, धनगरवाडी, देडगाव, बेलपिंपळगाव व बाभुळखेडा या 6 गावांतून प्रत्येकी तिघे बाधित आढळले.

वडाळा बहिरोबा, वंजारवाडी, तेलकुडगाव, पिचडगाव, मोरेचिंचोरे, म्हाळसपिंपळगाव, माका, लांडेवाडी, खडका, कांगोणी, चांदा व बहिरवाडी या 12 गावातून प्रत्येकी दोघे संक्रमित आढळून आले.

उस्थळदुमाला, सौंदाळा, सजलपूर, रस्तापूर, पुनतगाव, नेवासाबुद्रुक, मुकिंदपूर, कुकाणा, खुपटी, खरवंडी, करजगाव, गोंडेगाव, गोगलगाव, घोडेगाव, देवगाव, चिलेखनवाडी, बकुपिंपळगाव व अंमळनेर या 18 गावांतून प्रत्येकी एकजण संक्रमित आढळून आला. अशाप्रकारे 47 गावांतून 117 संक्रमित आढळून आले असून तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या 11 हजार 5 इतकी झाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com