नेवासा तालुक्यात 34 गावांतून 75 संक्रमित

नेवासा तालुक्यात 34 गावांतून 75 संक्रमित

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील 9 प्राथमिक आरोग्य केंद्रांअंतर्गत काल 34 गावांतून 75 करोना संक्रमित आढळून आले. सर्वाधिक 12 जण नेवासा शहरात आढळले तर त्या खालोखाल सोनईत 11 बाधित आढळले.

नेवासा खुर्द प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत नेवासा शहरात 12 बाधित आढळले. सोनई प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 20 बाधित आढळले. त्यातील सर्वाधिक 11 सोनईतील आहेत. अन्य गावांमध्ये शिंगणापूर येथील तिघे, वंजारवाडी येथील दोघे तर पानसवाडी, झापवाडी, मोरेचिंचोरे व गणेशवाडी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

नेवासा बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पाचेगाव येथे 5 संक्रमित आढळले. बेलपिंपळगाव येथे दोन तर निंभारी येथे एक बाधित आढळला.

सलाबतपूर केंद्राअंतर्गत मुकिंदपूर येथे दोघे, पिचडगाव, गिडेगाव व गोंडेगाव येथे प्रत्येकी एक असे पाच बाधित आढळले.

शिरसगाव केंद्राअंतर्गत सुलतानपूर येथे तिघे, पाथरवाला येथील दोघे, गेवराई व गोपाळपूर येथील प्रत्येकी एक असे 7 जण बाधित आढळले.

कुकाणा केंद्राअंतर्गत भेंडा खुर्द येथे तिघे, भेंडा बुद्रुक व कुकाणा येथे प्रत्येकी दोघे तर जेऊरहैबती येथे एक बाधित आढळून आला.

उस्थळदुमाला केंद्रांतर्गत म्हाळसपिंपळगाव, नारायणवाडी, माळीचिंचोरा व खरवंडी येथे प्रत्येकी एकजण बाधित आढळला. चांदा केंद्रांतर्गत चांदा, घोडेगाव, कांगोणी व रस्तापूर येथे प्रत्येकी एक बाधित आढळला.

टोका केंद्रांतर्गत भानसहिवरा येथे पाच तर बाभुळखेडा व खडका येथे प्रत्येकी एक असे 7 बाधित आढळले.

अशाप्रकारे 34 गावांतून 72 संक्रमित आढळल्याने तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 12 हजार 52 झाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com