नेवासा शहरात 18 संक्रमित

तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 7071 वर
नेवासा शहरात 18 संक्रमित

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यात सलग तीन दिवस मोठ्या संख्येने संक्रमित आढळून आल्यानंतर काल थोडा दिलासा मिळाला. काल तालुक्यातील 24 गावांतून 71 संक्रमित आढळून आले. सर्वाधिक 18 संक्रमित नेवासा शहरातील आहेत.

काल मंगळापूर येथे 8 सोनईत 7 तर वडाळा बहिरोबा येथे 6 संक्रमित आढळले. गोगलगाव येथे 5, पाचेगाव येथे 4 सलाबतपूर येथे तिघे संक्रमित आढळले.

कुकाणा, खरवंडी व म्हाळसपिंपळगाव या तीन गावातून प्रत्येकी दोघे संक्रमित आढळले. शिंगणापूर, सांगवी, पुणतगाव, वांजोळी, प्रवरासंगम, पिंप्रीशहाली, गळनिंब, देवगाव, देडगाव, घोडेगाव, मोरेचिंचोरे, भेंडा बुद्रुक, जेऊरहैबती व बेलपिंपळगाव या 14 गावातून प्रत्येकी एकजण संक्रमित आढळला. तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या 7071 इतकी झाली आहे.

5 गावातून 54 संक्रमित

नेवासा तालुक्यातील नेवासा शहर (18), मंगळापूर (8), सोनई (7), वडाळा बहिरोबा (6) व गोगलगाव (5) या पाच गावातून 54 संक्रमित आढळले. त्याशिवाय एका गावात चौघे, तीन गावातून प्रत्येकी दोघे तर 14 गावांतून प्रत्येकी एकजण संक्रमित आढळून आला.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com