नेवासा तालुक्यातील संक्रमितांची संख्या 7 हजारावर

तालुक्यात तीन दिवसांत वाढले 532 संक्रमित
नेवासा तालुक्यातील संक्रमितांची संख्या 7 हजारावर

नेवासा |का. प्रतिनिधी|Newasa

नेवासा तालुक्याने काल करोना संक्रमितांच्या संख्येचा 7 हजाराचा टप्पा गाठला. तीन दिवसात तालुक्यातून 532 बाधित आढळून आले. नेवासा, घोडेगाव येथे बाधितांची मोठी संख्या दिसून आली.

शुक्रवारी तालुक्यात 50 गावांतून 157, शनिवारी 36 गावांतून 206 तर काल रविवारी 47 गावांतून 169 संक्रमित आढळून आले.

शनिवारी नेवासा तालुक्यातील नेवासा शहरात 48, नेवासा बुद्रुक मध्ये 20 तर घोडेगाव येथे 25 असे तीन गावातूनच 93 संक्रमित आढळले होते.

काल रविवारी नेवासा खुर्द येथे 26, नेवासा बुद्रुक येथे 13, मुकिंदपूर येथे 11, सलाबतपूर, भेंडा बुद्रुक व घोडेगाव या तीन गावात प्रत्येकी दहा असे 6 गावांतून 80 संक्रमित आढळून आले.

उर्वरीत गावांपैकी मंगळापूर येथे 9, वडाळा बहिरोबा येथे 8 तर चांद्यात 7 संक्रमित आढळले. शिंगणापूर व कुकाणा व जैनपूर या तीन गावांमधून प्रत्येकी पाच संक्रमित आढळले.

सोनईत चौघे बाधित आढळले. बेलपिंपळगाव, रस्तापूर, तरवडी व वाकडी या चार गावातून प्रत्येकी तिघे संक्रमित आढळले.

उस्थळदुमाला, पिंप्रीशहाली, पानसवाडी, लांडेवाडी, जळके खुर्द, गळनिंब, दिघी या 7 गावांतून प्रत्येकी दोघे संक्रमित आढळले. वरखेड, वांजोळी, वंजारवाडी, सुरेगाव, शिरसगाव, सौंदाळा, रांजणगाव, पुनतगाव, प्रवरासंगम, माळीचिंचोरा, माका, खरवंडी, घोगरगाव, गेवराई, देवगाव, देडगाव, भेंडा खुर्द, भानसहिवरा, बेलपांढरी, अंतरवाली या 21 गावांतून प्रत्येकी एकजण संक्रमित आढळला. काल रविवारी एकूण 169 बाधित आढळल्याने तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 7 हजार इतकी झाली आहे.

दोन दिवसात नेवासा शहरात 74 बाधित

नेवासा शहरात संक्रमितांच्या संख्येत मोठी वाढ झाली. नेवासा शहरात (खुर्द) दोन दिवसात 74 बाधित आढळले. शनिवारी 48 बाधित आढळले होते. त्यात काल रविवारी आणखी 26 बाधितांची भर पडली. नेवासा बुद्रुकमध्येही दोन दिवसात 33 बाधित आढळले. शनिवारी 20 तर रविवारी 13 संक्रमित आढळले. घोडेगावच्या बाधितांची संख्या दोन दिवसात 35 इतकी आहे. शनिवारी घोडेगावात 25 तर काल रविवारी 10 बाधित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com