नेवासा : 33 गावांमधून आढळले 106 संक्रमित

नेवासा : 33 गावांमधून आढळले 106 संक्रमित

सोनईत 32 तर नेवासा शहरात 20 बाधीत

नेवासा |का. प्रतिनिधी|Newasa

नेवासा तालुक्यात काल 33 गावांमधून 106 संक्रमित आढळून आले. सोनई व नेवासा शहर मिळून 52 संक्रमित आढळले. अन्य 31 गावांमधून 54 संक्रमित आढळून आले.

काल सोनईत 32 तर नेवासा शहरात 20 संक्रमित आढळून आले. वडाळा बहिरोबा व लांडेवाडी या दोन गावात प्रत्येकी 5 बाधित आढळले. भेंडा बुद्रुक, खरवंडी, मुकिंदपूर व घोडेगाव या चार गावात प्रत्येकी तिघे संक्रमित आढळले. निपानीनिमगाव, मांडेगव्हाण, पाचेगाव, तामसवाडी, हंडीनिमगाव, माळीचिंचोरा व गणेशवाडी या 7 गावात प्रत्येकी दोघे संक्रमित आढळले.

वरखेड, रामडोह, उस्थळदुमाला, प्रवरासंगम, नवीन चांदगाव, नांदूरशिकारी, नेवासा बुद्रुक, तेलकुडगाव, मोरेगव्हाण, खुणेगाव, गोमळवाडी, दिघी, देवगाव, चांदा, भालगाव, बेल्हेकरवाडी, धामोरी व अमळनेर या 18 गावातून प्रत्येकी एकजण संक्रमित आढळून आला. अशाप्रकारे 33 गावांतून 106 संक्रमित आढळून आल्याने तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या 6 हजार 276 झाली आहे.

दोन गावांत 52 संक्रमित

नेवासा तालुक्यात काल सोनई (32) व नेवासा शहर (20) या दोन गावांतूनच 52 संक्रमित आढळले. त्याशिवाय दोन गावांतून प्रत्येकी पाच, चार गावांतून प्रत्येकी तिघे, 7 गावांतून प्रत्येकी दोघे तर 18 गावांतून प्रत्येकी एक संक्रमित आढळून आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com