नेवासा तालुक्यात तीन आठवड्यानंतर संक्रमितांची संख्या आली शंभराच्या खाली

38 गावांतून आढळले 76 बाधित
नेवासा तालुक्यात तीन आठवड्यानंतर संक्रमितांची संख्या आली शंभराच्या खाली

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यात काल तीन आठवड्यानंतर एका दिवसातील संक्रमितांची संख्या शंभरपेक्षा कमी आढळून आली. काल तालुक्यातील 38 गावांमधून 76 बाधित आढळून आले. याआधी 3 मे रोजी तालुक्यात 71 बाधित आढळले होते.

काल सोनई, तामसवाडी, भेंडा खुर्द, नेवासा शहर या चार गावांतून प्रत्येकी 6 संक्रमित आढळले. भेंडा बुद्रुक येथे चौघे बाधित आढळले तर निंभारी येथे तिघे बाधित आढळून आले.

घोडेगाव, लांडेवाडी, माळीचिंचोरा, जेऊरहैबती, बेलपिंपळगाव, देडगाव, गिडेगाव, लोहगाव, महालक्ष्मीहिवरे, माका, पानसवाडी, रांजणगाव व शिंगणापूर या 13 गावांतून प्रत्येकी दोघे बाधित आढळून आले.

झापवाडी, वडुले, सुलतानपूर, शहापूर, खेडलेपरमानंद, खडका, गोपाळपूर, मोरेचिंचोरा, शिंगवेतुकाई, तरवडी, करजगाव, पाचेगाव, हंडीनिमगाव, माळेवाडी, गोधेगाव, बर्‍हाणपूर, चिलेखनवाडी, चांदा व भानसहिवरा या 19 गावांतून प्रत्येकी एकजण संक्रमित आढळून आला.

अशाप्रकारे काल 38 गावांमधून 76 संक्रमित आढळून आले. तालुक्यातील एकूण करोना संक्रमितांची संख्या 10 हजार 782 इतकी झाली आहे. गेल्या काही दिवसात करोना बाधितांची संख्या वाढत होती. एक दिवस तर जवळपास चारशेची संख्या गाठली गेली होती. 3 मे रोजी शंभराच्या आत संक्रमित आढळले होते. त्यानंतर तीन आठवड्यांनी काल शंभरपेक्षा कमी संख्येने बाधित आढळून आले.

4 गावांतून 24 संक्रमित

सोनई, तामसवाडी, नेवासा खुर्द, भेंडा खुर्द या चार गावांत काल एकूण 24 संक्रमित आढळले. एका गावात चार, एका गावात तिघे, 13 गावांतून दोघे तर 19 गावांतून प्रत्येकी एकजण असे 38 गावांतून 76 बाधित आढळले असून ही मागील तीन आठवड्यातील निच्चांकी संख्या आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com