नेवासा : 29 गावांमधून आढळले 93 संक्रमित

नेवासा शहरात 19 तर सोनईत 18 बाधित
नेवासा : 29 गावांमधून आढळले 93 संक्रमित

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यासाठी कालचा दिवस दिलासा देणारा ठरला. बर्‍याच दिवसानंतर बाधितांची संख्या शंभराच्या खाली आली. काल 29 गावांमधून 93 संक्रमित आढळून आले.

सर्वाधिक 19 संक्रमित नेवासा शहरातून तर त्याखालोखाल 18 संक्रमित सोनईत आढळले. घोडेगाव व गोगलगाव येथे प्रत्येकी 8 संक्रमित आढळून आले.

गळनिंब येथे चौघे बाधित आढळून आले. सलाबतपूर व मंगळापूर येथे प्रत्येकी तिघे बाधित आढळले. प्रवरासंगम, पाचेगाव, निंभारी, म्हसले,म्हाळसपिंपळगाव, दिघी, भेंडा बुद्रुक व बाभुळखेडा या 8 गावातून प्रत्येकी दोघे संक्रमित आढळले.

तेलकुडगाव, शिंगणापूर, रांजणगाव, पानसवाडी, पाचुंदा, लांडेवाडी, माळेवाडी, कुकाणा, खरवंडी, हनुमानवाडी, मुकिंदपूर, गणेशवाडी, चिकनीखामगाव व भानसहिवरा या 14 गावांतून प्रत्येकी एकजण संक्रमित आढळून आला. अशाप्रकारे 29 गावांतून 93 बाधित आढळले. तालुक्यातील आतापर्यंतची एकूण संक्रमितांची संख्या 6 हजार 369 झाली आहे.

चार गावातून 53 संक्रमित

नेवासा तालुक्यात काल नेवासा शहर (19), सोनई (18), घोडेगाव (8), गोगलगाव (8) असे चार गावातून 53 बाधित आढळले. एका गावात चौघे बाधित आढळले. दोन गावातून तिघे, 8 गावांतून प्रत्येकी दोघे तर 14 गावांतून प्रत्येकी एकजण संक्रमित आढळला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com