नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यात करोना संक्रमणाच्या दुसर्या टप्प्यात दिवसागणिक संक्रमितांची वाढ होत असून

काल बुधवारी 25 गावातून 52 संक्रमित आढळून आले. सर्वाधिक 8 बाधित भेंडा बुद्रुकमध्ये आढळले. तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या 3530 झाली आहे.

काल भेंडा बुद्रुकमध्ये 8 संक्रमित आढळले. कुकाण्यात 6 बाधित आढळले. पाचेगाव येथे 5 संक्रमित आढळून आले. पाचेगावातील 5 बाधितांमधील तिघे गावातील तर दोघे कारवाडी भागातील आहेत. नेवासा शहरात चौघे बाधित आढळले. त्यातील एकजण नेवासा कारागृहातील आहे.

भेंडा खुर्द, जेऊरहैबती, लोहगाव, मुकिंदपूर, सौंदाळा, टोका, वडाळा बहिरोबा या 8 गावात प्रत्येकी दोघे संक्रमित आढळले.

चांदा, गेवराई, जुने कायगाव, महालक्ष्मी हिवरे, माळीचिंचोरे, पाथरवाला, रांजणगाव, साईनाथनगर व सोनई या 9 गावांमधून प्रत्येकी एक संक्रमित आढळून आला. तालुक्यात अशाप्रकारे एकूण 52 संक्रमित आढळले असून तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या 3530 झाली आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या 28 दिवसांत अवघे 25 संक्रमित आढळले होते. फेब्रुवारी अखेर एकूण संक्रमितांची संख्या 2953 होती. मार्च अखेरपर्यंत त्यात 577 बाधितांची भर पडल्याने आतापर्यंतची तालुक्यातील करोना संक्रमितांची संख्या 3530 वर गेली आहे.