नेवासा तालुक्यात 11 गावांत आढळले 20 करोनाबाधित

Corona
Corona

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील 11 गावांतून काल 20 करोना संक्रमित आढळून आले आहेत. सर्वाधिक 7 संक्रमित शिंगणापूर येथे आढळले असून

तालुक्यातील एकूण करोना संक्रमितांची संख्या 2564 झाली आहे. नेवासा तालुक्यात काल सर्वाधिक 7 करोनाबाधित शनीशिंगणापूर येथे आढळून आले. नेवासा शहर, जळके बुद्रुक व तरवडी येथे प्रत्येकी तिघे करोना बाधित आढळले.

मुकिंदपूर (नेवासाफाटा), नांदूरशिकारी, उस्थळखालसा, रांजणगाव, घोडेगाव, देवगाव व भेंडा बुद्रुक येथे प्रत्येकी एक करोना बाधित आढळून आला असून तालुक्यात विविध चाचण्यांमध्ये काल एकूण 20 करोना संक्रमित आढळून आले आहेत. तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या 2564 झाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com