नेवासा : 56 गावांतून 231 संक्रमित

नेवासा, घोडेगाव, वडाळा व सोनईत मोठी संख्या
नेवासा : 56 गावांतून 231 संक्रमित

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील 56 गावांतून काल 231 संक्रमित आढळून आले. सर्व मोठ्या गावांमध्ये संक्रमितांची मोठी संख्या आढळून आली. नेवासा शहर व घोडेगावातून प्रत्येकी 29, सोनईत 25, वडाळ्यात 16 संक्रमित आढळून आले.

माळीचिंचोरा येथे 10,भेंडा खुर्द येथे 8 खरवंडी व रांजणगाव येथे प्रत्येकी 7, भानसहिवरा येथे 6 तर रस्तापूर येथे 5 संक्रमित आढळले. तेलकुडगाव, खेडलेपरमानंद, उस्थळदुमाला, शिरसगाव, लांडेवाडी, कुकाणा व भेंडा बुद्रुक या 7 गावातून प्रत्येकी चौघे बाधित आढळले. नवीन चांदगाव, वांजोळी, मुकिंदपूर व मंगळापूर या चार गावातून प्रत्येकी तिघे संक्रमित आढळले.

तामसवाडी, पाचेगाव, माळेवाडी दुमाला, हिंगोणी, धनगरवाडी, वरखेड, वंजारवाडी, वाकडी, शिंगणापूर, झापवाडी, नेवासा बुद्रुक, जळके खुर्द, जैनपूर, देडगाव व अंतरवाली या 16 गावांतून प्रत्येकी दोघे बाधित आढळले.

सुलतानपूर, राजेगाव, महालक्ष्मीहिवरे, लोहगाव, लोहारवाडी, खुपटी, करजगाव, सुरेगाव,सौंदाळा, सलाबतपूर, प्रवरासंगम, पानसवाडी, घोगरगाव,देवसडे, अमळनेर, देवगाव, बाभुळखेडा, बेलपिंपळगाव व बेलपांढरी या 19 गावांतून प्रत्येकी एकजण संक्रमित आढळून आला.

अशाप्रकारे वरील 56 गावांतून 231 संक्रमित आढळून आल्याने नेवासा तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या 7 हजार 302 झाली आहे.

अवघ्या 5 गावात 109 संक्रमित

नेवासा तालुक्यातील पाच गावात काल 109 संक्रमित आढळले. त्यामध्ये नेवासा शहर (29), घोडेगाव (29), सोनई (25) वडाळा बहिरोबा (16) व माळीचिंचोरा (10) या गावांचा समावेश आहे. त्याशिवाय एका गावात 8, दोन गावातून प्रत्येकी 7, एका गावात 6, एका गावात 5, सात गावांतून प्रत्येकी चार, 4 गावातून प्रत्येकी तिघे, 16 गावांतून प्रत्येकी दोघे तर 19 गावांतून प्रत्येकी एकजण संक्रमित आढळला.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com