नेवासा शहरात 37 तर बुद्रुकमध्ये 13 बाधित

गोगलगाव 12, कुकाणा 10 तर तालुक्यात 180 संक्रमित
नेवासा शहरात 37 तर बुद्रुकमध्ये 13 बाधित
करोना

नेवासा |का.प्रतिनिधी|Newasa

नेवासा तालुक्यात काल 48 गावांतून 180 संक्रमित आढळून आले. सर्वाधिक 37 बाधित नेवासा खुर्दमध्ये

(शहर) तर 13 बाधित नेवासा बुद्रुकमध्ये आढळून आले. नेवासाफाटा (मुकिंदपूर) येथे 9 संक्रमित आढळले. गोगलगाव येथे 12 तर कुकाण्यात 10 बाधित आढळले.

राजेगाव येथे 7 संक्रमित आढळले. बेलपांढरी व सोनई येथे प्रत्येकी 6 संक्रमित आढळून आले. भानसहिवरा व सुरेगाव या दोन गावात प्रत्येकी 5 बाधित आढळले.

भेंडा बुद्रुक, देवगाव व वडाळा बहिरोबा या तीन गावात प्रत्येकी चौघे बाधित आढळले.

सलाबतपूर, घोडेगाव, धामोरी, मांडेगव्हाण व देडगाव 5 गावांतून प्रत्येकी तिघे संक्रमित आढळून आले.

सुरेशनगर, पाचेगाव, नारायणवाडी, लांडेवाडी, खुपटी, खरवंडी, करजगाव, जेऊरहैबती, गोपाळपूर, गोमळवाडी, चिलेखनवाडी, चांदा व अंतरवाली या 13 गावांतून प्रत्येकी दोघे संक्रमित आढळले. वांजोळी, वाकडी, तेलकुडगाव, तरवडी, शिरसगाव, शिंगणापूर, रांजणगाव, प्रवरासंगम, पिंप्रीशहाली, पाचुंदा, नजिकचिंचोली, माका, महालक्ष्मीहिवरे, जळके खुर्द, गोणेगाव, गोधेगाव व अमळनेर या 17 गावांतून प्रत्येकी एकजण संक्रमित आढळून आला. अशाप्रकारे 48 गावांतून काल 180 संक्रमित आढळून आले असून तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या 5 हजार 315 झाली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com