नेवासा तालुक्यातील 33 गावांतून 91 संक्रमित

नेवासा तालुक्यातील 33 गावांतून 91 संक्रमित

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील 33 गावांमधून काल 91 संक्रमित आढळून आले. नेवासा शहरात सर्वाधिक 10 बाधित आढळले.

खडका येथे 9, भेंडा खुर्द व सोनई येथे प्रत्येकी 7, करजगाव, घोडेगाव व भेंडा बुद्रुक या तीन गावांतून प्रत्येकी 5 बाधित आढळले. बाभुळखेडा व निंभारी येथे प्रत्येकी चौघे बाधित आढळले. धनगरवाडी येथे तिघे बाधित आढळले. तेलकुडगाव, खरवंडी, कौठा, गणेशवाडी, देडगाव, चिलेखनवाडी, भानसहिवरा, बकुपिंपळगाव व अंतरवाली या 9 गावांत प्रत्येकी दोघे बाधित आढळले.

झापवाडी, वाटापूर, उस्थळखालसा, तरवडी, शिरसगाव, शिंगणापूर, मुकिंदपूर, लोहगाव, कुकाणा, कांगोणी, जळके खुर्द, देवगाव, बेलपिंपळगाव व अमळनेर या 14 गावांतून प्रत्येकी एक संक्रमित आढळून आला. अशाप्रकारे 33 गावांतून 91 संक्रमित आढळून आले असून त्यामुळे एकूण संक्रमितांची संख्या 8875 झाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com