नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यात करोना संक्रमणाच्या दुसर्या टप्प्यात करोना संक्रमितांच्या संख्येचा उद्रेक झाला असून काल एकाच दिवशी 28 गावांतून 96 संक्रमित आढळून आले आहेत.

सर्वाधिक 14 संक्रमित कुकाण्यात आढळले. त्या खालोखाल 13 संक्रमित भेंडा बुद्रुकमध्ये तर 10 संक्रमित सोनईत आढळले. भेंडा खुर्द व नेवासा शहरात प्रत्येकी 7 जण संक्रमित आढळले.

जेऊरहैबती येथे पाच जण बाधित आढळले. गेवराई, घोडेगाव, तेलकुडगाव, पाचेगाव या चार गावात प्रत्येकी चौघे संक्रमित आढळले. उस्थळदुमाला व तरवडी येथे प्रत्येकी तिघे बाधित आढळले. मुकिंदपूर व पाथरवाला येथे प्रत्येकी दोघे संक्रमित आढळले.

सुरेगावदही, वडाळाबहिरोबा, वडुले, अंतरवाली, चिलेखनवाडी, माळीचिंचोरा, देडगाव, देवगाव, नेवासा बुद्रुक, निंभारी, पानसवाडी, प्रवरासंगम, रस्तापूर व शिंगवेतुकाई या 14 गावांतून प्रत्येकी एकजण संक्रमित असल्याचे चाचण्यांतून स्पष्ट झाले.

अशाप्रकारे काल तालुक्यातील 28 गावांमधून 96 बाधित आढळून आले असून हा करोना संक्रमितांचा तालुक्यातील आतापर्यंतचा उच्चांक आहे. एकाच दिवसात 96 बाधितांमुळे तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या 3626 वर गेली आहे.