<p><strong>नेवासा |का. प्रतिनिधी|Newasa</strong></p><p>नेवासा तालुक्यात काल 14 गावांतून 22 करोना संक्रमित आढळून आले असून तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या 3325 झाली आहे.</p>.<p>नेवासा शहर (नेवासा खुर्द) व नजिकचिंचोलीत सर्वाधिक प्रत्येकी चौघे संक्रमित आढळले. त्या खालोखाल गेवराई येथे तिघे बाधित आढळले. सोनई, घोडेगाव, गणेशवाडी, शिरेगाव, लोहगाव, खामगाव, गळनिंब, वडुले, सौंदाळा, नेवासा बुद्रुक व पाचुंदा या 11 गावांमध्ये प्रत्येकी एकजण संक्रमित आढळून आला.</p>