नेवासा तालुक्यात 13 गावांतून आढळले 17 बाधित

नेवासा तालुक्यात 13 गावांतून आढळले 17 बाधित

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा (Newasa) तालुक्यात 13 गावांतून 17 करोना बाधित (Covid 19 Positive)आढळून आले. सर्वाधिक 7 बाधित कुकाणा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत (Kukana Primary Health Center) आढळून आले.

मुकिंदपूर, पिंपरीशहाली, भेंडा बुद्रुक, वडुले या चार गावांतून प्रत्येकी दोघे बाधित आढळले. वाटापूर, गोमळवाडी, भालगाव, सुलतानपूर, चिलेखनवाडी, देडगाव, तेलकुडगाव, उस्थळदुमाला व घोडेगाव या 9 गावांतून प्रत्येकी एकजण बाधित आढळून आला. तालुक्यातील आतापर्यंतची करोना बाधितांची (Covid 19 Positive) संख्या 13 हजार 110 झाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com