नेवासा : 20 गावांतून आढळले 40 बाधित

वडुलेत दुसर्‍या दिवशीही सर्वाधिक 9 बाधित
नेवासा : 20 गावांतून आढळले 40 बाधित

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील (Newasa) 20 गावांतून काल 40 संक्रमित (Positive)आढळून आले असून वडुले (Vadule) येथे काल आणखी 9 बाधित आढळले.

काही दिवसांपासून तालुक्यात कुकाणा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या (Kukana Primary Health Center) कक्षेत सर्वाधिक बाधित आढळून (Positive Patient) येत आहेत. काल 17 बाधित आढळून आले असून वडुले येथे 9 बाधित आढळलेण तेलकुडगाव (Telkudgav) येथे तिघे, देडगाव येथे दोघे तर चिलेखनवाडी, देवगाव व कुकाणा येथे प्रत्येकी एकजण बाधित आढळला.

नेवासा बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेत 7 बाधित आढळले. गोधेगाव येथे तिघे, बेलपांढरी येथे तिघे तर बेलपिंपळगाव येथे एकजण बाधित आढळून आला.

शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या (Shirasgaon Primary Health Center) कक्षेत सुलतानपूर येथे तिघे, शिरसगाव येथे दोघे तर नजिकचिंचोली येथील एकजण संक्रमित आढळून आला. चांदा केंद्राअंतर्गत (Under Chanda Kendra) चांद्यात तिघे तर माका येथे एकजण बाधित आढळला. उस्थळदुमाला केंद्राअंतर्गत म्हाळसपिंपळगाव व रांजणगाव येथे प्रत्येकी एकजण बाधित आढळला. सोनई केंद्राअंतर्गत सोनई व मोरेचिंचोरे येथे प्रत्येकी एकजण बाधित आढळून आला. नेवासा खुर्द केंद्राअंतर्गत नेवासा खुर्द व अमळनेर येथे प्रत्येकी एकजण संक्रमित आढळला. टोका प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत (Toka Primary Health Centers) एकही संक्रमित आढळला नाही.

अशाप्रकारे तालुक्यातील 20 गावातून 40 संक्रमित आढळून आले असून तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या 13 हजार 10 इतकी झाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com