छोट्याशा वडुले गावात आढळले 15 बाधित

नेवासा तालुक्यात 3 दिवसांत 72 करोना संक्रमित
छोट्याशा वडुले गावात आढळले 15 बाधित

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यात (Newasa Taluka) काल शनिवारी 13 गावांतून 35 करोनाबाधित (Corona Positive) आढळून आले. कुकाणा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या (Primary Health Center) कार्यक्षेत्रात काही दिवसांपासून सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. काल शनिवारी वडुले (Vadule) येथे 15 बाधित आढळले.

गुरुवार, शुक्रवार व शनिवार या तीन दिवसांत 72 करोना बाधित (Corona Positive) आढळून आले. गुरुवारी 27 संक्रमित आढळून आले होते. शुक्रवारी 10 बाधित आढळले. तर शनिवारी 35 बाधित आढळले.

गुरुवारी सुलतानपूर (Sultanpur) येथे सर्वाधिक 5 बाधित आढळून आले. नेवासाफाटा (NewasaPhata) व नेवासा शहरात (Newasa City) प्रत्येकी तिघे बाधित आढळले. तेलकुडगाव व वडुले येथे प्रत्येकी दोघे संक्रमित आढळून आले.

अमळनेर, सलाबतपूर, शिरसगाव, नजिकचिंचोली, नांदूरशिकारी, तरवडी, चिलेखनवाडी व चांदा या 8 गावांत प्रत्येकी एकजण बाधित आढळला. अशाप्रकारे 13 गावांतून 27 बाधित आढळून आले.

शुक्रवारी माका येथे सर्वाधिक तिघे बाधित (Positive) आढळले. झापवाडी, सुलतानपूर, कुकाणा, वडुले, सांगवी, कांगोणी व घोडेगाव या 7 गावांत प्रत्येकी एकजण बाधित आढळला. अशाप्रकारे शुक्रवारी 8 गावांतून दहा बाधित आढळले.

शनिवारी तालुक्यातील 13 गावांतून 35 बाधित आढळले. त्यातील 21 बाधित एकट्या कुकाणा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील आहेत. यात वडुले येथे 15, तेलकुडगाव येथे तिघे तर तरवडी, भेंडा खुर्द व देडगाव येथील प्रत्येकी एका बाधिताचा समावेश आहे.

चांदा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेत तीन गावांतून 8 बाधित आढळले. त्यामध्ये महालक्ष्मीहिवरे येथे पाच, माका येथील दोघे तर कांगोणी येथील एकाचा समावेश आहे. सोनई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेत सोनई व पानसवाडी येथे प्रत्येकी एक जण बाधित आढळला. शिरसगाव केंद्राच्या कक्षेत गेवराई व सुलतानपूर येथील प्रत्येकी एकजण संक्रमित आढळला. सलाबतपूर केंद्राच्या अंतर्गत गोगलगाव येथील दोघे बाधित आढळले. उस्थळदुमाला, नेवासा खुर्द, नेवासा बुद्रुक व टोका या चार प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कक्षेत शनिवारी एकही बाधित आढळून आला नाही.

तालुक्यात तीन दिवसांत मिळून एकूण 72 संक्रमित आढळून आल्याने तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या 12 हजार 970 इतकी झाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com