corona
corona
सार्वमत

नेवासा तालुक्यात आज 6 करोना बाधित रूग्ण

Arvind Arkhade

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

नेवासा येथील कोविड केअर सेंटरमध्ये रविवारी 9 व्यक्तीच्या केलेल्या रॅपिड अँन्टिजेन टेस्टच्या अहवालात सर्व टेस्ट निगेटिव्ह आल्या आहे. तर खाजगी लॅब मधून आलेल्या अहवालात सोनई येथील 2 व्यक्ती करोना बाधित आढळून आले.

तर कुकाणा येथील 2 व्यक्ती व गोपाळपुर येथील 2 व्यक्तींनी शेवगाव येथे रॅपिड अँन्टिजेन टेस्ट केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अशी माहिती तालुका आरोग्य विभागाकडून मिळाली.

तालुक्यातील रुग्ण संख्या 491 वर गेली आहे. 03 व्यक्तींना डिस्चार्ज दिल्याने 339 रुग्ण आत्तापर्यंत करोनामुक्त झाले आहे. तर तालुक्यात 11 करोना बाधित व्यक्तींचा आज पर्यंत मृत्यू झाला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com