नेवासा : 57 गावांतून आढळले 144 संक्रमित

नेवासा व सोनईत प्रत्येकी 15, घोडेगाव 9, भानसहिवरेत 8 तर तरवडीत 6 बाधित
नेवासा : 57 गावांतून आढळले 144 संक्रमित

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील 57 गावांतून काल 144 करोना संक्रमित आढळून आले. नेवासा शहर व सोनईत प्रत्येकी 15, घोडेगावात 9 तर भानसहिवरेत 8 संक्रमित आढळले.

तरवडी येथे 6, खेडलेपरमानंद व मुकिंदपूर येथे प्रत्येकी 5 बाधित आढळले. चांदा, बकुपिंपळगाव, माका व सुलतानपूर या 4 गावांतून प्रत्येकी चौघे बाधित आढळले.

शिंगणापूर, महालक्ष्मीहिवरे, वांजोळी, कुकाणा व धनगरवाडी या पाच गावात प्रत्येकी तिघे बाधित आढळले.

रांजणगाव, म्हाळसपिंपळगाव, प्रवरासंगम, पानसवाडी, निंभारी, खेडलेकाजळी, जळके बुद्रुक, करजगाव व चिलेखनवाडी या 9 गावांतून प्रत्येकी दोघे बाधित आढळले.

शिंगवेतुकाई, वाघवाडी, उस्थळदुमाला, तामसवाडी, पुनतगाव, पाथरवाला, पाचेगाव, नेवासा बुद्रुक, सुरेगाव, लोहारवाडी, शहापूर, खामगाव, कौठा, वडाळा, नारायणवाडी, शिरसगाव, नजिकचिंचोली, गोपाळपूर, मांडेगव्हाण, माळेवाडी खालसा, गोधेगाव, मोरेचिंचोरे, गिडेगाव, पाचुंदा, घोगरगाव, गळनिंब, बेलपांढरी, गोगलगाव, देवगाव, बेलपिंपळगाव, भेंडा बुद्रुक व तेलकुडगाव या 32 गावांतून प्रत्येकी एकजण संक्रमित आढळून आला. अशाप्रकारे 57 गावांतून 144 संक्रमित आढळून आले असून तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या 9334 झाली आहे.

5 गावांतून 53 संक्रमित

नेवासा शहर, सोनई, घोडेगाव, भानसहिवरा व तरवडी या पाच गावांतून काल एकूण 53 संक्रमित आढळून आले. त्याशिवाय दोन गावांतून प्रत्येकी 5, चार गावांतून प्रत्येकी चौघे, पाच गावांतून प्रत्येकी तिघे, 9 गावांतून प्रत्येकी दोघे तर 32 गावांतून प्रत्येकी एकजण संक्रमित आढळून आला. अशाप्रकारे 57 गावांतून 144 संक्रमित आढळले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com