नेवासा |का.प्रतिनिधी|Newasa

नेवासा तालुक्यात करोना संक्रमितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून काल मंगळवारी तालुक्यात 44 करोना संक्रमित आढळून आले.

करोना संक्रमितांच्या आकडेवारीत सोनई-घोडेगाव पुढे असून काल सोनईत 9, घोडेगाव व प्रवरासंगममध्ये प्रत्येकी 5 तर नेवासा शहरात 6 संक्रमित आढळून आले.

काल तालुक्यातील 18 गावातून 44 संक्रमित आढळले. सोनई येथे सर्वाधिक 9 तर नेवासा शहरात 6 संक्रमित आढळले. घोडेगाव व प्रवरासंगम येथे प्रत्येकी पाच संक्रमित, हिंगोणी येथे तिघे तर नेवासा बुद्रुक व वडाळा बहिरोबा येथे प्रत्येकी दोघे संक्रमित आढळून आले.

बेलपिंपळगाव, भेंडा बुद्रुक, चांदा, देडगाव, गळनिंब, गोधेगाव, कांगोणी, कुकाणा, लांडेवाडी, लोहगाव, शिंगणापूर या 11 गावांतून प्रत्येकी एक संक्रमित आढळून आला असून तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या 3282 झाली आहे.