<p><strong>नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa</strong></p><p>नेवासा तालुक्यात काल 9 गावांतून 11 करोना संक्रमित आढळून आले असून एकूण संक्रमितांची संख्या 2873 झाली आहे.</p> .<p>काल तालुक्यातील सौंदाळा व गोपाळपूर येथे प्रत्येकी दोघे संक्रमित आढळून आले. नेवासा शहर, मुकिंदपूर, सोनई, चांदा, मोरेचिंचोरे, गोंडेगाव व सुकळी या 7 गावांत प्रत्येकी एक करोना बाधित आढळून आला. तालुक्यातील एकूण करोना संक्रमितांची संख्या 2873 झाली आहे.</p>