<p><strong>नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa</strong></p><p>नेवासा तालुक्यात बुधवारी 13 तर गुरुवारी 4 असे दोन दिवसात 17 करोना संक्रमित आढळून आले असून तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या 2833 झाली आहे. </p>.<p>बुधवारी तालुक्यातील 10 गावातून 13 संक्रमित आढळले. भेंडा बुद्रुक, सोनई व तेलकुडगावातून प्रत्येकी दोघे तर बाभुळखेडा, भालगाव, भेंडा खुर्द, गोगलगाव, मुकिंदपूर, पानसवाडी व तामसवाडी या 7 गावात प्रत्येकी एक संक्रमित आढळला होता. काल गुरुवारी भेंडा खुर्द येथे दोघे तर माका व वाटापूर येथे प्रत्येकी एक असे एकूण चौघे संक्रमित आढळले.</p>