नेवासा |का. प्रतिनिधी|Newasa

नेवासा तालुक्यात दोन दिवसांत 36 करोना संक्रमित आढळून आले असून तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 2642 झाली आहे.

सोमवारी तालुक्यातील 14 गावांतून 20 करोना संक्रमित आढळले तर मंगळवारी 16 संक्रमित आढळले.

सोमवारी नेवासा शहर व मुकिंदपूर येथे प्रत्येकी तिघे तर प्रवरासंगम व नेवासा बुद्रुक येथे प्रत्येकी दोघे संक्रमित आढळले. चिलेखनवाडी, गणेशवाडी, शिरेगाव, भेंडा बुद्रुक, पिचडगाव, रांजणगाव, माळीचिंचोरा, सांगवी, बेलपिंपळगाव व लोहारवाडी या 10 गावांतून प्रत्येकी एक संक्रमित आढळला.

काल मंगळवारी 8 गावांतून 16 संक्रमित आढळले. नेवासा शहरातील 5 जण संक्रमित आढळले. पिचडगाव येथील तिघे तर रांजणगावदेवी व सोनईतील प्रत्येकी दोघे संक्रमित आढळले. नेवासाफाटा, खुणेगाव व तरवडी येथील प्रत्येकी एकजण संक्रमित आढळला.

अशाप्रकारे दोन दिवसांत तालुक्यात एकूण 36 करोनाबाधित वाढले असून तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या 2642 झाली आहे.