नेवासा तालुक्यात करोना संक्रमितांची संख्या 2 हजारांवर

अवघ्या महिनाभरात वाढले एक हजार संक्रमित
corona
corona

नेवासा |का. प्रतिनिधी|Newasa

नेवासा तालुक्यात काल करोना संक्रमितांच्या संख्येने दोन हजाराचा टप्पा ओलांडला. मार्च महिन्यापासून करोना संक्रमण सुरू झाले होते.

6 सप्टेंबरला एक हजाराचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर अवघ्या 30 दिवसांत तालुक्यात आणखी एक हजाराची भर पडून तालुक्यातील करोना संक्रमितांची संख्या 2005 वर गेली.

नेवासा तालुक्यातील 11 गावांमधून काल 26 संक्रमित आढळून आले. त्यामुळे तालुक्यातील एकूण करोना संक्रमितांची संख्या 2005 झाली आहे. काल सर्वाधिक 8 संक्रमित चांदा येथे आढळून आले.

बाभुळखेडा व घोडेगाव येथे प्रत्येकी चार संक्रमित आढळले. भानसहिवरा व सोनईत प्रत्येकी दोघांना करोना संक्रमण झाले. भेंडा बुद्रुक, गेवराई, गोपाळपूर, शिंगणापूर, उस्थळदुमाला व वडाळाबहिरोबा या सहा गावांत प्रत्येकी एक करोना संक्रमित आढळून आला. अशाप्रकारे तालुक्यात काल 11 गावांतून 26 करोना संक्रमित आढळून आले. त्यामुळे तालुक्यातील एकूण करोना संक्रमितांची संख्या 2005 झाली आहे.

एक हजार संक्रमितांची संख्या 5 महिन्यांत झाली. त्यात आणखी हजाराची भर पडण्यास अवघा एक महिना लागला. करोनाबाबत झालेली जागृती, चाचण्यांची वाढलेली सुविधा व चाचण्या करून घेण्यास पुढे येत असलेले करोना संशयित यामुळे संक्रमितांची संख्या वाढली असल्याचे म्हटले जाते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com