नेवासा तालुक्यात नव्याने 10 संक्रमित

नेवासा तालुक्यात नव्याने 10 संक्रमित

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यात काल एकूण 10 करोना संक्रमित आढळून आले असून त्यामुळे नेवासा तालुक्यातील एकूण करोना संक्रमितांची संख्या

648 वर गेली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी यांनी दिली.

नेवासा तालुक्यातील दहा संक्रमितांमध्ये सर्वाधिक तिघे सोनईतील आहेत. तर देवसडे, भानसहिवरा, शिंगणापूर, नेवासा खुर्द, मुकिंदपूर, वडाळा बहिरोबा व निंभारी येथील प्रत्येकी एक असे 8 गावांतील एकूण 10 जण काल सायंकाळपर्यंत करोना संक्रमित आढळून आले.

वरील दहापैकी 7 जण रॅपिड अ‍ॅन्टीजन चाचण्यांमध्ये संक्रमित असल्याचे स्पष्ट झाले तर तिघे जण नगरच्या जिल्हा ग्रामीण रुग्णालयातील चाचणीत संक्रमित असल्याचे दिसून आले.

नेवासा तालुक्यात काल सायंकाळअखेर करोना संक्रमितांची एकूण संख्या 648 वर गेली. त्याशिवाय खासगी प्रयोगशाळेत काल तालुक्यातील 6 जण संक्रमित आढळल्याचे समजते.

खासगी प्रयोगशाळेतील संक्रमितांची नोंद जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्येत घेण्यात आली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com