नेवासा तालुक्यात 42 नवीन करोना बाधित रुग्ण

नेवासा तालुक्यात 42 नवीन करोना बाधित रुग्ण

नेवासा |शहर प्रतिनिधी| Newasa

गुरुवारी तालुक्यात नव्याने 42 करोना बाधित रुग्ण आढळले असल्याचे माहिती तहसीलदार रुपेश सुराणा यांनी दिली. तालुक्यातील रुग्णासंख्या चारशेचा आकडा पार करत 435 इतकी झाली आहे. तर करोनामुक्त झालेल्या रुग्ण संख्या 301 इतकी आहे.

नेवासा येथील कोविड केअर सेंटरमध्ये बुधवारी घेण्यात आलेले स्त्राव अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते. गुरूवारी आलेल्या अहवालात 11 व्यक्ती करोना बाधित आढळेल असून त्यामध्ये नेवासा शहर पाच, भानसहिवरा तीन तर नागापूर, कुकाणा व देवगाव येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

गुरुवारी खाजगी रुग्णालयातुन आलेल्या अहवालात नऊ करोना बाधित आढळले असून यामध्ये सोनई येथील चार, नेवासा शहर तीन, देवसडे व भानसहिवरा येथिल प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

गुरुवारी कोविड केअर सेंटर येथे 105 व्यक्तींच्या रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या यामध्ये 22 व्यक्ती करोना बाधित आढळून आले असून यात सोनई येथील आठ, नेवासा शहर आठ, भेंडा बुद्रुक येथील तीन, तर भानसहिवरा, खडका व कुकाणा येथील प्रत्येकी एक व्यक्ती करोना बाधित आढळून आले तर 83 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला असून तालुक्यातील रुग्ण संख्या 435 वर गेली आहे. 17 व्यक्तींना डिस्चार्ज दिल्याने 301 करोनामुक्त झाले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com