नेवासा : 20 गावांतून 23 संक्रमित

नेवासा : 20 गावांतून 23 संक्रमित

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा (Newasa) तालुक्यातील 20 गावातून काल 23 करोना संक्रमित (Covid 19 Positive) आढळून आले. शिरसगाव (Shirasgav) केंद्राअंतर्गत सर्वाधिक 6 संक्रमित आढळून आले. शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत (Shirasgaon Primary Health Center) असलेल्यता पिंप्रीशहाली येथे दोघे बाधित आढळले. खामगाव, गोयगव्हाण, शिरसगाव व वाकडी या गावांमध्ये प्रत्येकी एकजण बाधित आढळला.

चांदा केंद्राअंतर्गत (Chanda Center) पाचजण बाधित आढळले असून पाचुंदा येथील दोघे तर घोेडेगाव, फत्तेपूर व कांगोणी येथील प्रत्येकी एकजण बाधित आढळला. उस्थळदुमाला केंद्राअंतर्गत रांजणगाव येथील दोघे तर खरवंडीचा एकजण बाधित आढळला. कुकाणा केंद्राअंतर्गत भेंडा बुद्रुक, जेऊरहैबती व वडुले येथे प्रत्येकी एकजण बाधित आढळला. नेवासा बुद्रुक केंद्राअंतर्गत बहिरवाडी, बेलपिंपळगाव व बेलपांढरी येथील प्रत्येकी एकजण बाधित आढळला.

सोनई केंद्रातील (Sonai Center) शिेगाव येथे एकजण टोका केंद्राअंतर्गत प्रवरासंगम येथील एकजण, नेवासा खुर्द केंद्राअंतर्गत नेवासा खुर्द येथील एकजण बाधित आढळला. सलाबतपूर केंद्राअंतर्गत एकही बाधित आढळून आला नाही. अशाप्रकारे तालुक्यातील 20 गावांतून 23 बाधित आढळून आले असून तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 13 हजार 311 इतकी झाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com