नेवासा तालुक्यातील 12 गावांतून 21 संक्रमित

नेवासा तालुक्यातील 12 गावांतून 21 संक्रमित

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील 12 गावांतून काल 21 करोना संक्रमित आढळून आले. नेवासा शहर व देडगाव येथे सर्वाधिक प्रत्येकी चौघे बाधित आढळून आले.

पुनतगाव, सुलतानपूर व अंतरवाली या तीन गावांतून प्रत्येकी दोघे बाधित आढळले. निंभारी, करजगाव, गणेशवाडी, तरवडी, कुकाणा, रांजणगाव, महालक्ष्मीहिवरे या 7 गावांतून प्रत्येकी एकजण बाधित आढळला. अशाप्रकारे 12 गावांतून 21 करोना संक्रमित आढळून आले असून तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या 12 हजार 673 इतकी झाली आहे.

सलाबतपूर व टोका या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या अंतर्गत काल एकही संक्रमित आढळून आला नाही. कुकाणा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत सर्वाधिक 8 बाधित आढळले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com