नेवासा तालुक्यात 53 गावांतून आढळले 134 संक्रमित

नेवासा तालुक्यात 53 गावांतून आढळले 134 संक्रमित

कुकाणा केंद्र 28, उस्थळदुमाला 27, चांदा 24, सोनई 24, शिरसगाव 11, नेवासा खुर्द 7 तर टोका 6, सलाबतपूर 5

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील 9 प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 53 गावांतून काल मंगळवारी 135 करोना संक्रमित आढळून आले. सर्वाधिक संक्रमित कुकाणा केंद्रांतर्गत गावात (28) तर सर्वात कमी (5) बाधित सलाबतपूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेत आढळून आले.

कुकाणा केंद्रांतर्गत 12 गावांतून 28 बाधित आढळले. त्यामध्ये कुकाणा येथील 8, तरवडी, चिलेखनवाडी व भेंडा बुद्रुक येथील प्रत्येकी 3, भेंडा खुर्द, देवगाव व तेलकुडगाव येथील प्रत्येकी 2 तर शहापूर, सौंदाळा, नांदूरशिकारी, जेऊरहैबती व देवसडे येथील प्रत्येकी एका बाधिताचा समावेश आहे.

उस्थळदुमाला केंद्रांतर्गत 8 गावांतून 27 संक्रमित आढळले. सर्वाधिक 10 वडाळाबहिरोबा येथे आढळले. रांजणगाव व म्हाळसपिंपळगाव येथील प्रत्येकी चार, खरवंडी येथील तिघे, माळीचिंचोरा व कारेगाव येथील प्रत्येकी दोघे तर हंडीनिमगाव व नारायणवाडी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

चांदा केंद्रांतर्गत 9 गावांतून 24 बाधित आढळले. चांद्यात 8, घोडेगाव येथे चौघे, कांगोणी व कौठा येथे प्रत्येकी तिघे, रस्तापूर येथील दोघे तर लोहारवाडी, महालक्ष्मीहिवरे, पाचुंदा व राजेगाव येथील प्रत्येकी एका बाधिताचा समावेश आहे.

सोनई प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत शिंगणापूर येथे 10, सोनईत 8, पानसवाडी येथे 2 तर धनगरवाडी, करजगाव, मोरेचिंचोरे व वंजारवाडी येथील प्रत्येकी एकजण बाधित आढळला.

शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पाच गावांतून 11 बाधित आढळले. सुलतानपूर येथील चौघे, वाकडीतील तिघे, गेवराई येथील दोघे तर पिंपरी शहाली व शिरसगाव येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

नेवासा खुर्द प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत नेवासा खुर्द येथील पाच तर वाटापूर येथील दोघे असे 7 बाधित आढळून आले.

टोका प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत भानसहिवरे येथे 4, बकुपिंपळगाव व प्रवरासंगम येथील प्रत्येकी एक असे 6 बाधित आढळून आले.

सलाबतपूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पिचडगाव येथे दोन तर मुकिंदपूर, म्हसले व सुरेगाव या तीन गवांतील प्रत्येकी एक असे एकूण 5 जण संक्रमित आढळले.

नेवासा बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत नेवासा बुद्रुक व उस्थळखालसा येथील प्रत्येकी एक असे एकूण दोघे बाधित आढळून आले.

अशाप्रकारे नेवासा तालुक्यातील 53 गावांतून काल 134 करोना संक्रमित आढळून आले असून त्यामुळे तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या 11 हजार 921 झाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com