नेवाशातील 49 गावांतून 106 संक्रमित

सर्व गावांत बाधितांची संख्या एक अंकी
नेवाशातील 49 गावांतून 106 संक्रमित

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यात काल 49 गावांतून 106 करोना संक्रमित आढळून आले. काल तालुक्यातील कोणत्याही गावात दोनअंकी संख्येने बाधित आढळले नाहीत. सोनईत सर्वाधिक 9 संक्रमित आढळून आले.

नेवासा शहरात 8, धनगरवाडी येथे 7, भेंडा खुर्द येथे 6, भेंडा बुद्रुक येथे 5 संक्रमित आढळले. चिलेखनवाडी व घोगरगाव येथे प्रत्येकी चौघे बाधित आढळले. घोडेगाव, गोगलगाव, जेऊरहैबती, खरवंडी, निंभारी, प्रवरासंगम, तरवडी या 7 गावांतून प्रत्येकी तिघे बाधित आढळले. शिंगणापूर, रांजणगाव, पिंप्रीशहाली, लाखेफळ, गोधेगाव, बकुपिंपळगाव व अंमळनेर या 7 गावांतून प्रत्येकी दोघे संक्रमित आढळले.

वंजारवाडी, वाकडी, वडाळाबहिरोबा, उस्थळदुमाला, तामसवाडी, शिंगवेतुकाई, सलाबतपूर, रस्तापूर, पिचडगाव, पाचुंदा, नेवासा बुद्रुक, नजिकचिंचोली, माळीचिंचोरा, माळेवाडी दुमाला, मक्तापूर, लोहगाव, खडका, गोपाळपूर, गोमळवाडी, गिडेगाव, गळनिंब, दिघी, देवसडे, देडगाव, चांदा, भानसहिवरा, बाभुळखेडा व अंतरवाली या 28 गावांतून प्रत्येकी एकजण संक्रमित आढळून आला. अशाप्रकारे 49 गावांतून 106 संक्रमित आढळून आल्याने तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या 10 हजार 888 इतकी झाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com