एकट्या सोनईत आढळले 44 संक्रमित
करोनाबाधित रुग्णसंख्या

एकट्या सोनईत आढळले 44 संक्रमित

नेवासात 11, घोडेगाव 9 तर शिंगणापुरात 6 बाधित

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील एकट्या सोनईत काल 44 करोना संक्रमित आढळून आले. तालुक्यातील 54 गावांतून एकूण 160 बाधित आढळले.

नेवासा शहरात काल 11 बाधित आढळले. भानसहिवरे व करजगाव येथे प्रत्येकी 7, शिंगणापूर व म्हाळसपिंपळगाव येथे प्रत्येकी 6 बाधित आढळले. देडगाव येथे 5, बेलपिंपळगाव व माळीचिंचोरा येथे प्रत्येकी चार, वाटापूर, गळनिंब, धनगरवाडी व भेंडा बुद्रुक या चार गावात प्रत्येकी तिघे बाधित आढळले.

निंभारी, लांडेवाडी, हंडीनिमगाव, गोंडेगाव, गोगलगाव, जळके बुद्रुक, खरवंडी, घोडेगाव, गणेशवाडी, चिलेखनवाडी व भालगाव या 11 गावात प्रत्येकी दोघे संक्रमित आढळले.

वडाळा, वंजारवाडी, तामसवाडी, शिरेगाव, शिरसगाव, सौंदाळा, सजलपूर, रस्तापूर, पानसवाडी, पाचुंदा, निपानीनिमगाव, नजिकचिंचोली, मुकिंदपूर, मोरेचिंचोरे, माका, लोहगाव, कुकाणा, खेडलेपरमानंद, खडका, गिडेगाव, दिघी, देवसडे, देडगाव, चांदगाव, चांदा, भेंडा खुर्द व बकुपिंपळगाव या 27 गावांतून प्रत्येकी एकजण संक्रमित आढळला. अशाप्रकारे 54 गावांतून 160 संक्रमित आढळले असून तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या 9 हजार 494 झाली आहे.

दोन गावात 55 बाधित

नेवासा शहर व सोनई मिळून काल 55 संक्रमित आढळून आले.. दोन गावात प्रत्येकी 7, तीन गावात प्रत्येकी सहा, एका गावात 5, दोन गावांत प्रत्येकी चार, चार गावात प्रत्येकी तिघे, 11 गावांतून प्रत्येकी दोघे तर 27 गावांतून प्रत्येकी एकजण संक्रमित आढळून आला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com