नेवासा : 60 गावांतून आढळले 193 संक्रमित

नेवासा : 60 गावांतून आढळले 193 संक्रमित

नेवासा शहर 18, सोनई 17, जैनपूर 13, घोडेगाव 12, नेवासा बुद्रुक 10 बाधित

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील 60 गावांतून काल 193 संक्रमित आढळून आले. सर्वाधिक 18 नेवासा शहरात, सोनईतून 17, जैनपूरमधील 13, घोडेगावात 12 तर नेवासा बुद्रुकमध्ये 10 संक्रमित आढळून आले. तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या 9190 झाली आहे.

चांदा, खरवंडी व कुकाणा येथे प्रत्येकी सहा बाधित आढळून आले. खामगाव व महालक्ष्मी हिवरे येथे प्रत्येकी पाच संक्रमित आढळले.

भेंडा बुद्रुक, देवगाव, करजगाव, म्हाळसपिंपळगाव व तरवडी येथे प्रत्येकी चौघे संक्रमित आढळले. रांजणगाव, पुनतगाव, पाथरवाला, वांजोळी, पिंप्रीशहाली, मुकिंदपूर, माळीचिंचोरा व तेलकुडगाव या 8 गावात प्रत्येकी तिघे बाधित आढळले.

टोका, वरखेड, तामसवाडी, म्हसले, कौठा, माका, वडाळा, माका, शिरसगाव, गोपाळपूर, हिंगोणी, चांदगाव व भानसहिवरे या 13 गावात प्रत्येकी दोघे बाधित आढळले.

शिंगवेतुकाई, वाकडी, वाघवाडी, शंकरवाडी, पाचेगाव, मक्तापूर, लोहारवाडी, खुणेगाव, मक्तापूर, खेडलेपरमानंद, कारेगाव, जेऊरहैबती, गोणेगाव, गोयगव्हाण, गोधेगाव, गेवराई, देवसडे, देवगड, पाचुंदा, जळके बुद्रुक, देडगाव, चिलेखनवाडी, गोगलगाव, बेलपिंपळगाव व भेंडा बुद्रुक या 26 गावांमधून प्रत्येकी एक संक्रमित आढळला.

तालुक्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या 9 हजार 190 झाली आहे.

5 गावांतून 70 संक्रमित

नेवासा शहर, घोडेगाव, सोनई, जैनपूर व नेवासा बुद्रुक या पाच गावांतून एकूण 70 संक्रमित आढळले. तीन गावांतून प्रत्येकी 6, दोन गावांतून प्रत्येकी पाच, पाच गावांतून प्रत्येकी चार, 8 गावांतून प्रत्येकी तिघे, 13 गावांतून प्रत्येकी दोन तर 26 गावांतून प्रत्येकी एकजण संक्रमित आढळून आला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com