नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यात काल काल मंगळवारी 17 गावांतून 48 करोना संक्रमित आढळून आले.

सर्वाधिक 8 संक्रमित रांजणगाव येथे आढळले. तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या 3896 झाली आहे.

रांजणगाव येथे सर्वाधिक 8 संक्रमित आढळले. त्या खालोखाल धामोरी व नेवासा शहरात प्रत्येकी 7 जण बाधित आढळले. वडाळा बहिरोबा येथे सहा जण संक्रमित आढळले. सोनईत काल चौघे संक्रमित आढळले. नेवासा बुद्रुक, गोपाळपूर, गळनिंब, भेंडा बुद्रुक या चार गावात प्रत्येकी दोघे बाधित आढळले.

गोंडेगाव, भानसहिवरे, देवगाव, घोगरगाव, माळेवाडी, पाचेगाव, शिंगवेतुकाई व पाथरवाला या 8 गावात प्रत्येकी एकजण संक्रमित आढळून आला. अशाप्रकारे 17 गावांतून 48 जण संक्रमित आढळले.