नेवाशात 16 गावांतून 23 संक्रमित

नेवाशात 16 गावांतून 23 संक्रमित

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा (Newasa) तालुक्यातील 16 गावांतून काल 23 करोना संक्रमित (Covid 19 Patient) आढळून आले. सर्वाधिक 8 बाधित शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या (Shirasgaon Primary Health Center) कार्यक्षेत्रात आढळून आले. नेवासा खुर्द केंद्राअंतर्गत चिंचबन येथे एक तर गोमळवाडी येथे दोघे बाधित आढळले. सोनई केंद्रांतर्गत लोहगाव येथे एक बाधित आढळला.

नेवासा (Newasa) बुद्रुक केंद्रांतर्गत गोधेगाव येथे एक बाधित आढळला. शिरसगाव केंद्रातील गेवराई व वाकडी येथे दोघे तर खामगाव, पाथरवाला सुलतानपूर, नजिकचिंचोली या चार गावात प्रत्येकी एकजण बाधित (Positive) आढळला. कुकाणा केंद्राअंतर्गत तेलकुडगाव व वडुले येथे प्रत्येकी दोघे तर सुकळी येथे एकजण बाधित आढळला.

उस्थळदुमाला केंद्रांतर्गत खरवंडी येथे दोघे बाधित आढळले. चांदा केंद्राअंतर्गत कौठा येथे दोघे तर पाचुंदा येथे एकजण बाधित आढळला. टोका व सलाबतपूर केंद्राअंतर्गत काल एकही बाधित आढळला नाही. अशाप्रकारे 16 गावांतून 23 जण बाधित आढळल्याने तालुक्यातील एकूण करोना संक्रमितांची संख्या 13 हजार 288 इतकी झाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com