नेवासा : करोना बाधितांची संख्या पुन्हा शंभरावर

नेवासा : करोना बाधितांची संख्या पुन्हा शंभरावर

47 गावांतून आढळले 109 संक्रमित

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यात दहा दिवसापासून दररोजच्या करोना बाधितांची संख्या दोन अंकी असताना काल गुरुवारी संख्येने शतक ओलांडत बाधितांची संख्या 109 झाली. काल 47 गावांतून हे बाधित आढळून आले.

नेवासा खुर्द केंद्रांतर्गत चार गावातून 23 बाधित आढळले. नेवासा शहरात 12 निंभारीत 9 तर खुपटी व वाटापूर येथील प्रत्येकी एकजण बाधित आढळला.

शिरसगाव केंद्रांतर्गत 21 जण बाधित आढळून आले. सुलतानपूर, शिरसगाव येथे प्रत्येकी पाच, नजिकचिंचोली व पाथरवाला येथे प्रत्येकी तीन, वाकडी येथील दोन तर रामडोह, पिंप्रीशहाली व गोपाळपूर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. उस्थळदुमाला केंद्रांतर्गत 5 गावातून 11 बाधित आढळले. रांजणगाव येथील चौघे, माळीचिंचोरा, हंडीनिमगाव व वडाळा येथील प्रत्येकी दोघे तर खरवंडी येथील एकाचा समावेश आहे. कुकाणा केंद्रातील 6 गावातून 11 बाधित आढळले. कुकाणा व अंतरवाली येथील प्रत्येकी तिघे, तरवडी येथील दोघे तर भेंडा बुद्रुक, भेंडा खुर्द व देडगाव येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

सलाबतपूर केंद्रांतर्गत चार गावातून 8 जण बाधित आढळले. मुकिंदपूर येथील 8, गळनिंब येथील दोघे तर मंगळापूर व गोंडेगाव येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. नेवासा बुद्रुक केंद्रांतर्गत 7 गावातून 11 बाधित आढळले. भालगाव व गोधेगाव येथील प्रत्येकी तिघे तर नेवासा बुद्रुक, बहिरवाडी, धामोरे, जैनपूर व पाचेगाव येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सोनई केंद्रातील 5 गावातून 9 बाधित आढळले. करजगाव येथील चौघे, सोनईतील दोघे तर पानसवाडी, झापवाडी व धनगरवाडी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

चांदा केंद्रांतर्गत घोडेगाव येथील तिघे, महालक्ष्मी हिवरे, चांदा व कौठा येथील प्रत्येकी एक अशा 6 जणांचा समावेश आहे. टोका केंद्राअंतर्गत मडकी येथील दोघे तर भानसहिवरा, बाभुळखेडा, बकुपिंपळगाव येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. 47 गावांतून 109 बाधित आढळल्याने तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 12 हजार 463 इतकी झाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com