नेवाशात नवा उच्चांक; एकाच दिवशी आढळले 398 बाधित

नेवासा 57, सोनई 42, निंभारी 29, मुकिंदपूर 25, सुलतानपूर 14, पुनतगाव व चांदा प्रत्येकी 12, भानसहिवरा व शिंगणापूर 11 तर भेंडा खुर्दमध्ये 10 बाधित
नेवाशात नवा उच्चांक; एकाच दिवशी आढळले 398 बाधित

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यात काल बुधवारी करोना संक्रमितांच्या संख्येचा आतापर्यंतचा उच्चांक गाठला गेला. आतापर्यंत एकाच दिवशी जास्तीत जास्त 303 संक्रमितांचा उच्चांक होता. काल मात्र जवळपाच चार शतक (398) गाठले गेले. 76 गावांमधून एवढ्या संख्येने बाधित आढळले.

नेवासा शहरात सर्वाधिक 57 बाधित आढळले. त्या खालोखाल सोनईत 42, निंभारी येथे 29, मुकिंदपूर येथे 25, सुलतानपूर येथे 14, पुनतगाव व चांदा येथे प्रत्येकी 12, शिंगणापूर व भानसहिवरेत प्रत्येकी 11 तर भेंडा खुर्दमध्ये 10 संक्रमित आढळून आले.

कुकाणा, घोडेगाव जेऊरहैबती व देवगाव या चार गावात प्रत्येकी 8 बाधित आढळले.

अमळनेर येथे 7 बाधित आढळले. गोगलगाव येथे 6 बाधित आढळले. बाभूळखेडा, खामगाव, हंडीनिमगाव व पाचेगाव या 4 गावांतून प्रत्येकी 5 बाधित आढळले.

प्रवरासंगम, तरवडी, खुपटी, शहापूर, देडगाव, करजगाव, चिलेखनवाडी या 7 गावात प्रत्येकी चौघे बाधित आढळले.

शिंगवेतुकाई, वांजोळी, नेवासा बुद्रुक, नांदूरशिकारी, खडका, गेवराई, पानसवाडी, बेलपिंपळगाव, व भेंडा बुद्रुक या 9 गावांतून प्रत्येकी तिघे बाधित आढळले.

बकुपिंपळगाव, गळनिंब, पाचुंदा, गोधेगाव, शिरसगाव, वडाळा, माळीचिंचोरा, कारवाडी, वाकडी, उस्थळखालसा, पानेगाव, सलाबतपूर, नारायणवाडी या 13 गावांतून प्रत्येकी दोघे बाधित आढळले.

वरखेड, वंजारवाडी, शिरेगाव, पिंप्रीशहाली, तामसवाडी, कौठा, गणेशवाडी, दिघी, रांजणगाव, धामोरी, देवसडे, पिचडगाव, देवगड, लोहगाव, लोहारवाडी, बहिरवाडी, माका, कांगोणी, गोपाळपूर, बेल्हेकरवाडी, जळके खुर्द, मोरेचिंचोरा, गिडेगाव, धनगरवाडी, तेलकुडगाव व अंतरवाली या 26 गावांतून प्रत्येकी एकजण संक्रमित आढळून आला.

अशाप्रकारे 76 गावांतून 398 संक्रमित आढळून आले असून तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या 10 हजार 337 इतकी झाली आहे.

10 गावात 223 संक्रमित

नेवासा, सोनई, निंभारी, मुकिंदपूर, सुलतानपूर, पुनतगाव, चांदा, भानसहिवरा, शिंगणापूर व भेंडा खुर्द या 10 गावांतून काल 223 करोना संक्रमित आढळून आले. या शिवाय 4 गावांतून प्रत्येकी 8, एका गावात 7, एका गावात 6, चार गावांतून प्रत्येकी 5, सात गावांतून प्रत्येकी चार, 9 गावांतून प्रत्येकी तिघे, 13 गावांतून प्रत्येकी दोघे तर 26 गावांतून प्रत्येकी एकजण संक्रमित आढळून आला. करोना चाचण्यांची संख्या वाढल्याने अधिक संख्येने संक्रमित आढळून आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com