नेवासा : 68 गावांतून आढळले पावणेतिनशे संक्रमित

सोनईत 53, पुनतगाव 23, लांडेवाडी 17 तर घोडेगावात 15 बाधित
नेवासा : 68 गावांतून आढळले पावणेतिनशे संक्रमित

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील 68 गावांतून काल 274 करोना संक्रमित आढळून आले. सोनईत सर्वाधिक 53, पुनतगावात 23, लांडेवाडी येथे 17 तर घोडेगाव येथे 15 संक्रमित आढळून आले.

निंभारी येथे काल 9 संक्रमित आढळले. चांदा येथे 8 तर नेवासा बुद्रुक व भानसहिवरा येथे प्रत्येकी 7 बाधित आढळले.

गणेशवाडी व नेवासा खुर्द येथे प्रत्येकी 6 बाधित आढळले. मुकिंदपूर व कौठा येथे प्रत्येकी 5 संक्रमित आढळले.

जैनपूर, कांगोणी, खेडलेकाजळी, पानसवाडी व सुलतानपूर या 5 गावात प्रत्येकी चौघे बाधित आढळले.

रांजणगाव, नारायणवाडी, नजिकचिंचोली, म्हसले, म्हाळसपिंपळगाव, महालक्ष्मीहिवरे, कुकाणा, खेडलेपरमानंद, वंजारवाडी व बेलपिंपळगाव या 10 गावांतून प्रत्येकी तिघे बाधित आढळले.

देडगाव, गेवराई, जेऊरहैबती, खडका, खुणेगाव, खरवंडी, लोहगाव, मोरेचिंचोरे, प्रवरासंगम, सौंदाळा, शिंगवेतुकाई, शिरसगाव, सुरेगाव व उस्थळदुमाला या 14 गावांतून प्रत्येकी दोघे संक्रमित आढळले.

तामसवाडी, शहापूर, पाचुंदा, माळीचिंचोरा, माका, मडकी, खलालपिंप्री, करजगाव, जायगुडे आखाडा, जळके खुर्द, हिंगोणी, हनुमानवाडी, घोगरगाव, धनगरवाडी, धामोरी, चिलेखनवाडी, भेंडा खुर्द, बेल्हेकरवाडी, बर्‍हाणपूर, बकुपिंपळगाव, बाभुळवेढा, अंतरवाली, अमळनेर या 23 गावांतून प्रत्येकी एक संक्रमित आढळून आला.

अशाप्रकारे 68 गावांतून 274 संक्रमित आढळून आले असून तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या 9 हजार 939 इतकी झाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com