नेवासा : 55 गावांतून आढळले 225 संक्रमित

सोनईत 28, सजलपूर 15, निंभारी व देडगाव प्रत्येकी 11, गणेशवाडी व नेवासा प्रत्येकी 10
नेवासा : 55 गावांतून आढळले 225 संक्रमित

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील 55 गावांतून काल 225 करोना संक्रमित आढळून आले. सर्वाधिक 28 सोनईतून, सजलपूर येथे 15, निंभारी व देडगाव येथे प्रत्येकी 11, गणेशवाडी व नेवासा शहर येथे प्रत्येकी 10 संक्रमित आढळून आले.

खरवंडी, लांडेवाडी व भानसहिवरा येथे प्रत्येकी 7, भेंडा बुद्रुक व शिंगणापूर येथे प्रत्येकी 6, तामसवाडी, रांजणगाव, शहापूर, कांगोणी व बेल्हेकरवाडी या 5 गावांतून प्रत्येकी पाच जण संक्रमित आढळले.

नारायणवाडी, माळीचिंचोरा, मुकिंदपूर, भेंडा खुर्द, बर्‍हाणपूर व चांदा या 6 गावांतून प्रत्येकी चौघे बाधीत आढळले.

भालगाव, बेलपिंपळगाव, कुकाणा, करजगाव, म्हसले, महालक्ष्मीहिवरे, खलालपिंप्री व सुलतानपूर या 8 गावांतून प्रत्येकी तिघे संक्रमित आढळून आले.

रस्तापूर, जळके खुर्द, घोडेगाव, सौंदाळा, नजिकचिंचोली, पुनतगाव, खडका, तरवडी व प्रवरासंगम या 9 गावात प्रत्येकी दोघे बाधित आढळले.

वांजोळी, पाचेगाव, वाकडी, खुपटी, कौठा, कारवाडी, दिघी, धामोरी, देवगाव, पानसवाडी, माका, जेऊरहैबती, निपानीनिमगाव, चिलेखनवाडी, अंतरवाली, बेलपांढरी या 16 गावातून प्रत्येकी एकजण संक्रमित आढळून आला.

अशाप्रकारे 55 गावांतून काल 225 संक्रमित आढळून आल्याने तालुक्यातील एकूण करोना संक्रमितांची संख्या 10 हजार 706 इतकी झाली आहे.

6 गावांतून 85 संक्रमित

सोनई, सजलपूर, निंभारी, देडगाव, गणेशवाडी व नेवासा शहर या 6 गावांतून काल 85 संक्रमित आढळून आले. तीन गावांतून प्रत्येकी 7, दोन गावांतून प्रत्येकी 6, पाच गावांतून प्रत्येकी पाच, 6 गावांतून प्रत्येकी चार, 8 गावांतून प्रत्येकी तिघे, 9 गावांतून प्रत्येकी दोघे तर 16 गावांतून प्रत्येकी एकजण संक्रमित आढळून आला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com