नेवासा तालुक्यात 26 गावातून 46 संक्रमित

नेवासा तालुक्यात 26 गावातून 46 संक्रमित

नेवासा (का. प्रतिनिधी)

नेवासा तालुक्यात आज रविवारी 26 गावांतून 46 करोना संक्रमित आढळून आले.

सर्वाधिक प्रत्येकी चौघे संक्रमित वंजारवाडी व बेलपिंपळगाव येथे आढळले. नांदूर शिकारी व देवसडे येथे प्रत्येकी तिघे बाधित आढळले. नेवासा खुर्द, गोमळवाडी, गिडेगाव, जेऊर हैबती, कुकाणा, शहापूर, तेलकुडगाव, भेंडा खुर्द, रांजणगाव व रस्तापूर या दहा गावांतून प्रत्येकी दोघे संक्रमित आढळून आले. कौठा, घोडेगाव, म्हाळस पिंपळगाव, वडाळा बहिरोबा, उस्थळ दुमाला, चिलेखनवाडी, देडगाव, सुकळी, पिंपरी शहाली, वडुले, गोगलगाव व पानसवाडी या बारा गावांतून प्रत्येकी एक जण बाधित आढळून आला.

अशाप्रकारे 26 गावांतून 46 करोना संक्रमित आढळून आले. तालुक्यातील आतापर्यंतची करोना संक्रमितांची संख्या 14 हजार 501 वर गेली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com