महागाई विरोधात नेवाशात भारतीय कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने

वाढती महागाई रोखण्यात मोदी सरकार अपयशी
महागाई विरोधात नेवाशात भारतीय कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने

नेवासा (तालुका प्रतिनिधी) / Newasa - जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती आकाशाला भिडल्या असून (rising commodity prices) मोदी सरकार महागाई रोखण्यासाठी अपयशी ठरल्याचे निषेधार्थ नेवासा तालुका भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने (Communist Party of India) बुधवार दि.30 जून रोजी दुपारी 12 वाजता नेवासा तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

नेवाशात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने नेवासा तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने महागाईच्या विरोधात तसेच मोदी सरकार महागाई रोखण्यासाठी अपयशी ठरल्याबददल निषेध आंदोलन सुरु आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती आकाशाला भिडल्या आहेत.

तेल, डाळी, अन्य धान्य व इतर जीवनावश्यक वस्तु खरेदी करणे गोरगरीब जनतेच्या आवाक्याबाहेर गेलेले आहे.सर्व महागाईचे मुळ देशात पेट्रोल आणी डिझेलच्या वाढलेल्या प्रचंड किंमती आणी मोदी सरकारची जनविरोधी धोरणे आहेत.

2014 च्या असणार्‍या किंमतीच्या 60 ते 70 टक्के पेट्रोल आणी डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत उलटपक्षी क्रूड ऑईलच्या किंमतीत आंतरराष्ट्रीय बाजारात 50 ते 60 टक्के घट झाली तरी पण जनतेला महाग इंधन खरेदी करावे लागत आहे. पेट्रोल , डिझेलवरील कर हे सरकारने आर्थिक बजेटचा मुख्य स्रोत बनवल्याचा परिणाम आहे.

आज डिझेल 96 रू . तर पेट्रोल 108 रु.च्या आसपास झाले आहे. या किंमतीत सरकारच्या कराचा वाटा 40 ते 45 टक्क्यांपर्यंत आहे . एकीकडे जनता कोरोना बरोबर लढत असताना सरकारने यातुन जनतेची प्रचंड लुट करत आहे.मार्च 2020 मधे किंमती घटत असताना त्याचा लाभ ग्राहकांना देण्याऐवजी 13 ते 16 रुपये अबकारी करात वाढ करुन जनतेला लाभापासून वंचित ठेवले . डिसेंबर 2020 अखेर केंद्र सरकारने इंधनावरील करापोटी 5 लाख 25 हजार कोटीची कमाई करून जनतेच्या पैशावर दिवसाढवळ्या दरोडा घातला आहे.

करोना काळात आरोग्य व्यवस्थेवर मोठा खर्च होत असल्यामुळे दर कमी करता येणार नाही असे निर्लज पणे पेट्रोलियम मंत्री सांगतात , 35 हजार कोटी लसीकरणासाठी दिले असतानाही चक्क मंत्री खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत आहे. वाढत्या इंधन दरामुळे अन्न धान्य व जीवनाश्यक वस्तुंची वाहतुक महाग झाल्याने सर्वच वस्तु महाग झाल्या आहेत त्याच्या झळा मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य जनतेला बसत आहे.

स्वयंपाकाचा गॅस महाग झाला आहे. 450 रू. असलेले सिलेंडर 860 रू. ला झाले आहे . त्यामुळे जनतेचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. उज्वला गॅस योजनेत जनतेची मोठी फसवणूक झाली आहे. लाभार्थ्यांना सिलेंडर घेणे आवाक्याबाहेर झाले आहे . त्यामुळे महिला पुन्हा चुलीकडे आणी सरपणाकडे वळल्या आहेत. रॉकेल मुक्तीच्या नावाखाली हक्काचे केरोसिनला मुकली आहे . त्याचे मुख्य कारण उज्वला गॅस योजनेसारखी बोगस योजना. त्यामुळे जनतेला पुन्हा केरोसीन मिळण्याची व्यवस्था झाली पाहिजे.

इंधन स्वस्त मिळण्याची इंधनावरील कर मोठ्या प्रमाणात कमी केले पाहिजेत आणी डिझेल पेट्रोल स्वयंपाकाचा गॅस जी.एस.टीच्या कक्षेत आणले पाहिजे , परंतु सरकार याबद्दल खुपच उदासीन आहे . जनतेच्या लुटीत सरकार धन्यता मानत आहे . गॅस सिलेंडर वरील अनुदान मिळाले पाहिजे . इंधनाबाबतची धोरणे ही सर्व अंबानीच्या आर्थिक हितासाठी राबवले जात आहे. सरकारने जनतेची क्रय शक्ती वाढण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला पैशाच्या स्वरूपात आर्थिक मदत करणे गरजेचे आहे.

सार्वजनिक वितरण व्यवस्था बळकट करून तेल , डाळी सह अन्न , धान्य मुबलक प्रमाणात मिळायला हवे . खते बी - बियाणे , खते याच्या वाढत्या किंमतीला आळा घालणे आवश्यक आहे म्हणून आम्ही खालील मागण्यांचे निवेदन देत आहोत .निवेदनातील मागण्या ...1) पेट्रोल डिझेलची दरवाढ मागे घ्या.व अबकारी करात कपात करुन त्याचा लाभ जनतेला द्या. 2) गॅस सिलेंडर च्या किंमती करून त्यावरील सबसिडी पुन्हा सुरु करा.

गरीबांची चेष्टा आणी फसवणूक करणारी उज्वला गँस योजनेच्या लाभार्थ्यांना व इतर जनतेला रॉकेल मुक्तीच्या नावाखाली बंद केलेला केरोसीन पुरवठा पुन्हा सुरु करा. 3) रेशन दुकानातुन जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा मुबलक प्रमाणात करा. 4) प्रत्येक कुटुंबाला 10 हजार रपयाची आर्थिक मदत करा. 5) आभासी पॅकेज नको. प्रत्यक्षात मदत द्या. 6) खते बि बियाणे क्रुषी निविष्ठा जी.एस.टीमुक्त करून शेतकर्यांना मदत करा.

या निदर्शनात कॉ.बाबा अरगडे, कॉ.बन्सी सातपुते,कॉ.आप्पासाहेब वाबळे,कॉ.भारत अरगडे, कॉ.दत्ता गवारे,संजय फुलमाळी,भाऊसाहेब अरगडे, लक्ष्मण कडु, नामदेव गोरे, लक्ष्मण शिंदे, नंदु उमाप, सुनिल उमाप, आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. निवासी नायब तहसीलदार श्री.परदेशी यांनी निवेदन स्विकारले. सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर यावेळी उपस्थित होते.

महागाई विरोधात नेवाशात भारतीय कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने
करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना मिळणार आर्थिक मदत
No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com