कामिका एकादशीनिमित्त उद्या नेवासा बंद
सार्वमत

कामिका एकादशीनिमित्त उद्या नेवासा बंद

प्रशासनाचा निर्णय

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

(नेवासा बुद्रुक वार्ताहर) - कामिका एकादशी निमित्त भाविकांच्या होणार्‍या गर्दीच्या पार्श्वभूमीवर उद्या नेवासा बंद ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत प्रशासनाने घेतला आहे.

श्री क्षेत्र नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर येथीस पैस खांबाच्या दर्शनासाठी कमिका एकादशी निमित्त भाविकांच्या होणारी गर्दी लक्षात घेता बंदचा निर्णय घेण्यात आला आहे.

नेवासा तहसील कार्यालय येथे आज सकाळी झालेल्या बैठकीसाठी प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन,तहसीलदार रुपेशकुमार सुराणा पोलीस निरीक्षक रणजीत डेरे, मुख्याधिकारी समीर शेख, सतीश पिंपळे, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, युवा नेते संजय सुखधान व सामाजिक कार्यकर्ते यांच्या सह श्री ज्ञानेश्वर मंदिर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com