नेवासा शहर व चांद्यात प्रत्येकी 12 संक्रमित

कुकाण्यात 10, भेंड्यात 9 तर तालुक्यात नव्याने 108 बाधित
नेवासा शहर व चांद्यात प्रत्येकी 12 संक्रमित

नेवासा |का.प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यात काल 31 गावांतून 108 करोना संक्रमित आढळून आले. काल नेवासा खुर्द व चांद्यात प्रत्येकी 12 संक्रमित आढळून आले.

कुकाणा येथे 10 तर भेंडा येथे 9 बाधित आढळले. वडाळाबहिरोबा व सोनई येथे प्रत्येकी 6 संक्रमित आढळून आले. घोडेगाव येथे 5 बाधित आढळले.

नेवासा बुद्रुक, खुणेगाव, मांडेगव्हाण व कांगोणी या चार गावात प्रत्येकी चौघे बाधित आढळले.

रस्तापूर, कौठा, मुकिंदपूर व जायगुडे आखाडा या चार गावात प्रत्येकी तिघे बाधित आढळले. राजेगाव, हाळसपिंपळगाव, बेलपांढरी व अमळनेर या चार गावात प्रत्येकी दोघे बाधित आढळून आले. जेऊरहैबती, सुलतानपूर, खेडलेपरमानंद, बेलपिंपळगाव, गळनिंब, मोरगव्हाण, तेलकुडगाव, मुरमे, निंभारी व सलाबतपूर या 10 गावात प्रत्येकी एकजण संक्रमित आढळून आला. अशाप्रकारे 31 गावांतून काल 108 संक्रमित आढळून आले असून तालुक्यातील एकूण करोना संक्रमितांची संख्या 5135 झाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com